Tilak Varma l आयपीएल 2025 दरम्यान मुंबई इंडियन्स संघात एक अनपेक्षित घडामोड घडली आहे. तिलक वर्मा याला भर सामन्यातून बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याने थेट सोशल मीडियावर मोठा निर्णय घेतला असून, यामुळे अंबानींच्या मुंबई इंडियन्स ब्रँडवरच थेट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात १९ व्या षटकात फक्त पाच धावा निघाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने तिलक वर्माला ‘रिटायर्ड आऊट’ करत मैदानाबाहेर पाठवले. या निर्णयामुळे तिलक वर्माला मोठा मानसिक धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि कर्णधाराने घेतलेल्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे.
सोशल मीडियावरून व्यक्त केला संताप :
या घटनेनंतर तिलक वर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून थेट मुंबई इंडियन्सचे नावच काढून टाकले आहे. त्याचे हे पाऊल चाहत्यांसाठी धक्कादायक ठरले असले तरी त्याला सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळत आहे. अनेक चाहते मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर संताप व्यक्त करत आहेत आणि तिलकच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत.
तिलक वर्माचा हा निर्णय मुंबई इंडियन्स ब्रँडसाठी चिंतेची बाब ठरली आहे. आयपीएलसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ब्रँडची प्रतिमा अतिशय महत्त्वाची असते. तिलक वर्माने संघात असतानाच हे धाडस केले असून, त्यामुळे त्याच्या मनात किती खदखद होती हे अधोरेखित होते.
Tilak Varma l मुंबई इंडियन्सचा पुढचा पाऊल काय? :
तिलक वर्माचा निर्णय आता संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरू शकतो. सोशल मीडियावर निर्माण झालेल्या प्रतिकूल वातावरणामुळे मुंबई इंडियन्सवर दबाव निर्माण झाला आहे. अंबानींनी या घटनेची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संघाकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी लवकरच काहीतरी पाऊल उचलले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तिलक वर्माचा संताप आणि चाहत्यांचा रोष पाहता, हे प्रकरण लवकर मिटण्याची शक्यता कमीच आहे.






