TikTok पुन्हा भारतात परतणार?, M2 अ‍ॅपमुळे चर्चेला उधाण

On: July 11, 2025 3:33 PM
TikTok India comeback
---Advertisement---

TikTok M2 Launch | एकेकाळी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेलं शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप TikTok पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याच्या पॅरेंट कंपनी ByteDance ने ‘TikTok M2’ नावाचं नवीन व्हर्जन तयार केलं असून, हे अ‍ॅप 5 सप्टेंबर रोजी अमेरिकेत लॉन्च होणार आहे. त्यामुळे भारतात TikTok पुन्हा येणार का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

TikTok M2 हे विशेषतः अमेरिकन युजर्ससाठी डिझाइन करण्यात आलं असून, मूळ TikTok App अ‍ॅप स्टोअरवरून हटवण्यात येणार आहे. यामुळे अमेरिकेत TikTok ची जागा M2 अ‍ॅप घेणार आहे, आणि जगभरातील डिजिटल धोरणांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

TikTok M2 कशासाठी आणि का? :

TikTok M2 हे अ‍ॅप तयार करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेत TikTok वरील संभाव्य बंदी आणि डेटा सुरक्षेबाबतची चिंता. अमेरिकन सरकारने ByteDance ला 17 सप्टेंबर 2025 पर्यंत TikTok चा व्यवसाय एका स्थानिक अमेरिकी कंपनीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी TikTok ला जानेवारी 2025 मध्ये बंद करण्याची शक्यता होती, मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे मुदत वाढवण्यात आली.

Apple च्या अ‍ॅप स्टोअर धोरणांमुळेही ByteDance ला TikTok M2 हे वेगळं अ‍ॅप बनवावं लागत आहे. कारण Apple एकाच अ‍ॅपमध्ये देशनिहाय आवृत्त्या ठेवण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे, अमेरिकन युजर्ससाठी वेगळं आणि अधिक डेटा-सुरक्षित अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

TikTok M2 Launch | भारतात TikTok पुनरागमन करणार? :

भारत सरकारने TikTok सहित अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. TikTok वर अजूनही बंदी कायम असूनही, तरुणांमध्ये त्याचं आकर्षण टिकून आहे. आता अमेरिकेसाठी तयार होणाऱ्या TikTok M2 च्या यशावर भारतातही TikTok चं पुनरागमन होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवतात.

जर TikTok M2 हे अ‍ॅप अमेरिकेत यशस्वी ठरलं आणि ByteDanceने स्थानिक भागीदारी किंवा डेटा नियंत्रणाच्या नव्या अटींनुसार काम केलं, तर भारतातही सरकारसोबत चर्चा करून TikTok परत आणण्याची रणनीती राबवली जाऊ शकते. सध्या तरी भारतात TikTok चं पुनरागमन अजूनही अनिश्चित आहे, पण जगभरात ByteDance ची ही नवी चाचपणी महत्त्वाची मानली जात आहे.

News Title: TikTok M2 Launch: Will TikTok Make a Comeback in India After US Relaunch?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now