IPL 2025 l आयपीएल 2025 च्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) दिल्ली कॅपिटल्सचा (DC)12 धावांनी पराभव केला. सामन्यात एकीकडे जबरदस्त फलंदाजी व गोलंदाजी पाहायला मिळाली, तर दुसरीकडे IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेली धक्कादायक घटनाही अनुभवायला मिळाली. दिल्लीच्या डावाच्या 19 व्या षटकात, सलग तीन चेंडूंवर तीन फलंदाज धावबाद झाले – आणि याने चाहत्यांना चक्रावून टाकले.
सामना अगदी शेवटच्या टप्प्यावर रंगतदार होत चालला होता. शेवटचे तीन षटक, 39 धावा आणि मैदानात दिल्लीकडून चांगली फलंदाजी. मात्र, बुमराहच्या अचूक थ्रो आणि क्षेत्ररक्षकांच्या चपळतेमुळे सामन्याचा संपूर्ण प्रवाह बदलला.
बुमराहच्या षटकात धावबादांची ‘हॅटट्रिक’ :
डावाच्या 19व्या षटकात जसप्रीत बुमराहने गोलंदाजीची जबाबदारी घेतली. पहिल्या तीन चेंडूंमध्ये काही धावा झाल्या, मात्र चौथ्या चेंडूवर आशुतोष शर्मा दोन धावांसाठी धावताना धावबाद झाला. पुढच्याच चेंडूवर कुलदीप यादवही धावबाद झाला आणि पाचव्या चेंडूवर मोहित शर्मालाही धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद करून बुमराहने इतिहास रचला.
आयपीएलच्या इतिहासात सलग तीन चेंडूंवर तीन फलंदाज धावबाद होण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी एकाच षटकात तीन धावबादाची नोंद झाली होती, पण सलग तीन चेंडूंवर नाही!
दिल्लीने गमावला जिंकता येण्याजोगा सामना :
या सामन्याचा निष्कर्ष पाहता, दिल्ली कॅपिटल्स (DC) जिंकण्याच्या अगदी जवळ होती. करुण नायरने 89 धावांची झंझावाती खेळी करत दिल्लीच्या विजयाची शक्यता निर्माण केली होती. पण शेवटच्या षटकांमध्ये आलेली घाई आणि बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजासमोर सहज धाव घेण्याच्या चुका फायद्यात जाण्याऐवजी घातक ठरल्या.
मुंबईकडून कर्ण शर्माने (karn sharma) 3 विकेट घेतल्या आणि ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरला. हा मुंबई इंडियन्सचा IPL 2025 मधील दुसरा विजय ठरला.






