राज्यावर मोठं संकट; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

On: October 27, 2025 10:33 AM
Maharashtra Weather
---Advertisement---

Weather Update | दिवाळीचा सण संपला तरी राज्यातून पावसाचे सावट काही दूर झालेले नाही. उलट, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या संभाव्य चक्रीवादळामुळे आणि अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पुढील काही दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ‘मोंथा’ची शक्यता :

राज्यातील अनेक भागांमध्ये दिवाळीतही पावसाने हजेरी लावली. आता बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी अधिक तीव्र होऊन खोल कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, याचे लवकरच ‘मोंथा’ (Montha) चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. किनारपट्टी भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, कारण पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Weather Update | अरबी समुद्रातही कमी दाब :

दुसरीकडे, अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर २५ ते २९ ऑक्टोबर या काळात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ४५ किलोमीटर राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी तो ताशी ५५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. भारतीय तटरक्षक दलानेही मच्छीमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. (Cyclone)

या दोन्ही प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईत आज ढगाळ हवामान असून, पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. रविवारीही मुंबई आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू होती. कुलाबा केंद्रात १४.६ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात ६.६ मिमी पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून जात असल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हवामान कोरडे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

News Title- Threat Looms Over Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now