राष्ट्रवादीचा हा बडा नेता अडचणीत; राजकीय वर्तुळात खळबळ

On: March 8, 2023 2:59 PM
ncp flag
---Advertisement---

बीड | भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अशोक शेजुळ यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke), त्यांच्या पत्नी मंगला सोळंके आणि उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी धुलिवंदनाच्या दिवशी शेजुळ यांच्यावर अज्ञात चार ते पाच जणांनी हल्ला करत तू लय प्रकाश सोळंकेंच्या तक्रारी करतो का ? असं म्हणत लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

याप्रकरणी श्री. शेजुळ यांच्या फिर्यादीवरून आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगला सोळंके, टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now