आता स्वप्नातील घर बांधणं सोपं होणार ! केंद्र सरकारची मोठी तरतूद

On: January 30, 2023 6:32 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी लागणारी किंमत मात्र भरभक्कम असते. सामान्यांचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) प्रधानमंत्री आवास योजना आणली होती. ज्यामध्ये तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार तुम्हाला मदत करेल.

येत्या 1 फेब्रुवारीला 2023-24 वर्षाचं आर्थिक बजेट मांडण्यात येणार आहे. या बजेटकडून अनेकजणांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पात केंद्र सरकार पीएमआवास योजनेबद्दल (PM Awas Yojana) मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जाण्याची शक्यता आहे.

यासंबधित सीएनबीसी-आवाज कडून माहिती मिळाली आहे. सरकार 2024 पर्यंत 84 लाख घरांचं लक्ष्य ठेवणार आहे. त्यासाठी 40 हजार कोटींहून अधिक बजेट ठेवता येईल. अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजनेला मोठी चालना मिळू शकते. गेल्यावर्षीचा विचार करता गेल्यावर्षी 48 हजार कोटींचा निधी देण्यात आला होता.

दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजना 25 जून 2015 ला सुरु करण्यात आली होती. या योजनेतून प्रत्येक भारतीयाला त्यांचं हक्काचं घर मिळवून देण्याचं लक्ष्य आहे. 2024 पर्यंत सरकाराचं हे लक्ष्य आहे. या योजनेच्या मदतीतून सरकार सर्वसामान्यांना घर बांधण्यासाठी पैशाची मदत करते.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now