माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणी मोठी अपडेट समोर!

On: January 31, 2025 10:55 AM
Third Extension For Filing Chargesheet In Vanraj Andekar Murder Case Mastermind Brought Pistol From MP
---Advertisement---

Vanraj Andekar Murder Case | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी नगरसेवक (Former Corporator) वनराज आंदेकर (Vanraj Andekar) खून प्रकरणी (Murder Case) 18 आरोपींविरुद्ध (Accused) आरोपपत्र (Chargesheet) दाखल करण्यासाठी विशेष ‘मकोका’ (MCOCA) न्यायालयाने तिसऱ्यांदा मुदतवाढ (Extension) दिली आहे. (Vanraj Andekar Murder Case)

वनराजचा खून करण्यासाठी आरोपींनी मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) पिस्तूल (Pistol) आणि काडतुसे (Cartridges) आणली होती, त्यामुळे तेथे जाऊन तपास करायचा आहे, तसेच दोन प्रत्यक्षदर्शी (Eyewitnesses) साक्षीदारांचे जबाब (Statements) नोंदवायचे आहेत. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज गुन्हे शाखेने (Crime Branch) न्यायालयात (Court) केला होता. त्यावर विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे (Special Judge V. R. Kachare) यांनी पोलिसांना 15 फेब्रुवारीपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.

मध्य प्रदेशात जाऊन तपास करणार

आतापर्यंत प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांमार्फत आरोपींची ओळख चाचणी (Identification Test) घेण्यात आली असून, वनराज आंदेकरवरील हल्ल्याचे तसेच दापोली (Dapoli) येथील पेट्रोल पंपाचे (Petrol Pump) चित्रीकरण (Footage) संकलित करून विश्लेषणासाठी (Analysis) न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे (Forensic Science Laboratory) पाठविण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड (Abhishek alias Aba Narayan Khond), आकाश बापू म्हस्के (Akash Bapu Mhaske) आणि संगम संपत वाघमारे (Sangam Sampat Waghmare) यांनी मध्य प्रदेशच्या सीमेवरून (Border) पिस्तुले आणि काडतुसे आणल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, तेथे जाऊन तपास करायचा आहे. आरोपी हल्ला करून पसार झाले होते. त्यांना कोणी मदत केली, याबाबत शोध घ्यायचा आहे. त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी तपास अधिकारी गणेश इंगळे (Ganesh Ingle) यांनी केली. (Vanraj Andekar Murder Case)

कौटुंबिक, संपत्ती आणि वर्चस्वाच्या वादातून हत्या

कौटुंबिक संपत्ती तसेच वर्चस्वाच्या वादातून गेल्या वर्षी एक सप्टेंबर रोजी नाना पेठेतील (Nana Peth) डोके तालीम (Doke Talim) परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून आंदेकरांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी एकूण 22 आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून, त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा (Minors) समावेश आहे. आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार (Mastermind) सोमनाथ गायकवाड (Somnath Gaikwad), अनिकेत दूधभाते (Aniket Dudhbate), प्रकाश कोमकर (Prakash Komkar), गणेश कोमकर (Ganesh Komkar) यांच्यासह एकूण 18 आरोपी न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.

दोन वेळा मुदतवाढ

या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ घेतली असून, आता तिसऱ्यांदा मुदत देण्यासाठीचा अर्ज तपासाधिकारी सहायक आयुक्त गणेश इंगळे यांनी विशेष न्यायालयात केला होता. त्याला कोर्टाने मान्यता दिली.

थोडक्यात, वनराज आंदेकर खून प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणात वापरण्यात आलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. (Vanraj Andekar Murder Case)

Title : Third Extension For Filing Chargesheet In Vanraj Andekar Murder Case Mastermind Brought Pistol From MP

 

Abhishek alias Aba Narayan Khond Akash Bapu Mhaske Analysis Aniket Dudhbate Border Cartridges Chargesheet Court Crime Branch Dapoli Extension Eyewitnesses Footage Forensic Science Laboratory Ganesh Komkar Identification Test Judicial custody madhya pradesh Marathi News MasterMind MCOCA Minors Petrol Pump Pistol Prakash Komkar Pune Sangam Sampat Waghmare Somnath Gaikwad Special Judge V. R. Kachare Statements Vanraj Andekar Murder Case अनिकेत दूधभाते अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड अल्पवयीन आकाश बापू म्हस्के आरोपपत्र ओळख चाचणी काडतुसे खून प्रकरण गणेश कोमकर गुन्हे शाखा चित्रीकरण जबाब दापोली न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा न्यायालय न्यायालयीन कोठडी पिस्तूल पुणे पेट्रोल पंप प्रकाश कोमकर प्रत्यक्षदर्शी मकोका मध्य प्रदेश मराठी बातमी मुख्य सूत्रधार मुदतवाढ वनराज आंदेकर विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे विश्लेषण संगम संपत वाघमारे साक्षीदार सीमा सोमनाथ गायकवाड

Join WhatsApp Group

Join Now