जात पडताळणीचा प्रश्न महायुतीच निकाली काढणार- संभाजीराव पाटील निलंगेकर

On: October 31, 2024 7:21 PM
Sambhaji Patil Nilangekar
---Advertisement---

निलंगा | तत्कालीन काँग्रेस सरकारने मराठवाड्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रकरणी अन्यायकारक भूमिका घेतली. त्यामुळे हा समाज अडचणीत सापडला असून निलंगा मतदारसंघात आपण हा प्रश्न निकाली काढला आहे. याच धर्तीवर महायुतीचे सरकार संपूर्ण मराठवाड्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न निकाली काढेल, असा विश्वास संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी व्यक्त केला. निटूर येथील आदिती मंगल कार्यालयात सकल आदिवासी महादेव कोळी समाजाचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना निलंगेकर बोलत होते.

अध्यक्षस्थानी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष चंद्रहंस नलबले तर मंचावर भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर चेअरमन, दगडू साळुंके, निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, माजी सभापती अप्पाराव नाटकरे, रामभाऊ काळगे, माधव पिटले, तम्मा माडीबोने, तानाजी घंटे, तात्याराव गंपले, श्रावण रावळे, अनंत धडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) म्हणाले की, 2004 मध्ये सत्तेत येणाऱ्यांना सरकार बनवण्यासाठी 25 आमदारांची गरज होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारांच्या म्हणण्यानुसार आदिवासी महादेव कोळी समाजास जात प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेत मराठवाड्यावर अन्याय केला. तेव्हापासून मराठवाड्यात जात पडताळणीही होत नाही. निलंगा मतदारसंघासाठी आपण हा विषय सोडविला आहे. संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार सक्षम असल्याचे ते म्हणाले.

“विधानसभेत आवाज उठवून मी पाठपुरावा करेन”

निलंगेकर यांनी सांगितलं की, ज्यांनी सत्तेसाठी समाजावर अन्याय केला त्यांचेच पार्सल आपल्या मतदारसंघात पाठवण्यात आले आहे. ते परत पाठवून काँग्रेसला धडा शिकवा. निलंग्यासह इतर मतदारसंघातही प्रत्येक नागरिकाने किमान पाच मते मिळवून द्यावीत. आपले जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवून मी पाठपुरावा करेन. याप्रकरणी शासनाचा आदेश काढून देण्यासाठी मी बांधील असल्याचे निलंगेकर म्हणाले.

यावेळी बोलताना मराठवाडा अध्यक्ष चंद्रहंस नलमले यांनी समाजावरील अन्याय अन्याय कथन केला. जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध आंदोलने केली. केवळ निलंगेकर यांच्यातच हा प्रश्न सोडविण्याची धमक आहे. त्यासाठी समाजाने त्यांच्या मागे पाठबळ उभे करावे, असे ते म्हणाले.

राम काळगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव पिटले तर संचलन व आभार प्रदर्शन दत्ता शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास निलंगा मतदारसंघातील आदिवासी महादेव कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार’; संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास

UPI नियमांत 1 नोव्हेंबरपासून ‘हा’ मोठा बदल होणार!

तिजोरीत ‘या’ 3 वस्तू ठेवा; धन-संपत्तीत होईल वाढ

जब्याला मिळाली शालू!, राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे अडकणार लग्नबंधनात?

दादांचा शिलेदार कोंडीत, सुनील शेळकेंच्या अडचणी आणखी वाढल्या

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now