…नाहीतर हप्ता थांबणार; लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट

On: September 30, 2025 3:20 PM
Ladaki Bahin Yojana
---Advertisement---

Ladaki Bahin Yojana | महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घुसखोरी थांबवण्यासाठी आणि योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आता शासनाने e-KYC (ई-केवायसी) करणे बंधनकारक केले आहे. ज्या महिलांचे ई-केवायसी अपूर्ण असेल, त्यांचा पुढील मासिक हप्ता थांबवण्यात येईल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, गेल्या वर्षभरात पात्र महिलांच्या खात्यात १८,००० रुपये (१५०० रुपये दरमहा) जमा झाले आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यांत या योजनेत घुसखोरी झाल्याचे, तसेच काही पुरुष आणि अपात्र सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. ही घुसखोरी थांबवण्यासाठी आणि योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक केले आहे. ज्या महिलांचे ई-केवायसी अपूर्ण राहील, त्यांचा पुढील मासिक हप्ता थांबवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

e-KYC साठी आवश्यक कागदपत्रे

‘लाडकी बहीण’ योजनेचे e-KYC पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवाशी दाखला (किंवा रेशन कार्ड / मतदान ओळखपत्र), उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती आणि इतर नमूद केलेली कागदपत्रे अवश्यक आहेत.

e-KYC करण्याची प्रक्रिया

लाभार्थी महिलांना e-KYC पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. e-KYC करण्यासाठी शासनाच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन वेबसाईटवर ई-केवायसी पर्यायावर क्लिक करून तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक भरावे. त्यानंतर मागितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. ई-महासेवा केंद्रावर देखील हि प्रक्रिया पूर्ण करून घेता येईल. अर्ज सबमिट करून, कागदपत्रे जमा झाल्याची खात्री करून घ्यावी. आता सणासुदीचे दिवस आहेत. महिलांवरील कामाचा ताण पाहता केवायसी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

लाडक्या बहिणींसाठी बिनव्याजी कर्ज

या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना शून्य टक्के व्याजदराने १ लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येत आहे. सध्या ही योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू करण्यात आली असून, उर्वरित महाराष्ट्रात लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास मदत होणार आहे. सध्या मुंबई बँकेने ३ सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी कर्ज पुरवठा सुरू केला आहे. मुंबईसह आजुबाजूच्या लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होणार आहे.

News Title- Important update about ladki bahin Yojana

Join WhatsApp Group

Join Now