गणेश चतुर्थीनिमित्त सरकारने घेतला मोठा निर्णय!

On: September 8, 2024 4:22 PM
CM Eknath Shinde Resign
---Advertisement---

Anandacha Shidha | गणेश चतुर्थीचे निमित्त साधून सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  राज्य सरकारकडून पुन्हा एकदा ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त 100 रुपयांत चणाडाळ, तेल, साखर, रवा मिळणार आहे.

‘आनंदाचा शिधा’ उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सरकारने मात्र काही अटी ठेवल्या आहेत. या आनंदाच्या शिध्यात (Anandacha Shidha) एकूण चार वस्तू असतील.

पुन्हा’आनंदाचा शिधा’ मिळणार

फक्त 100 रुपयांत या चारही वस्तू मिळणार आहेत. यात चणाडाळ (1 किलो), सोयाबीन तेल (1 लिटर), साखर (1 किलो), रवा (1 किलो) या चार वस्तू मिळतील.

सराकरच्या या उपक्रमाचा लाभ जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधरक आहे, त्यांना मिळणार आहे. सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही हा आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) दिला जाईल.

लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा हा आनंदाचा शिधा गणेशोत्सवात मिळणार असल्याने नागरिक खुश होते. या आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटपासाठी सरकारकडून तब्बल 562 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहेत.

दिवाळी, दसरा, गुढीपाडव्या सारख्या सणासुदीला राज्यातील गरीब व गरजू शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ ही योजना राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे. आता गणपतीला देखील आनंदाचा शिधा मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

दीपिकाच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

“शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही”

गणपती बाप्पाला ‘या’ राशीचे लोक फार प्रिय असतात!

आयफोन 16 ‘या’ देशात मिळणार सर्वात स्वस्त!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now