‘मी निवडणूक लढवणारच’; भाजप नेत्याचा लेक ऐकायलाच तयार नाही

On: October 21, 2024 7:08 PM
BJP Yuva Morcha
---Advertisement---

Bjp | महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे, पण ही यादी जाहीर होताच भाजपमधून (Bjp) पहिली बंडखोरी समोर आली आहे. बेलापूरमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे आमदार गणेश नाईक यांचे पूत्र संदीप नाईक नाराज झाले आहेत.

भाजपने नवी मुंबईच्या ऐरोलीमधून गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे, पण गणेश नाईक यांचे पूत्र संदीप नाईक यांना भाजपने बेलापूरमधून उमेदवारी दिलेली नाही. भाजपने बेलापूरमधून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप नेत्याचा लेक ऐकायलाच तयार नाही

तिकीट मिळवण्यासाठीही संदीप नाईक यांनी जोरदार प्रयत्न केले होते, पण त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही आणि भाजपने पुन्हा एकदा बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांच्यावरच विश्वास दाखवला आहे.

बेलापूरमधून इच्छुक असलेले त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे संदीप नाईक यांनी बंडाचे निशाण फडकावत मी निवडणूक लढवणारच अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Bjp | “मी संदीपचा प्रचार करणार नाही”

भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. माझे चिरंजीव संदीप नाईक यांना मी विधानसभा निवडणूक लढवू नको, असं सांगितलं पण माझ्यावर अन्याय झाल्याचं त्यांनी मला सांगितलं. निवडणूक लढवून, जनतेच्या न्यायालयात जाऊन माझ्यावरचा अन्याय मी दूर करेन, असं त्यांनी मला सांगितलं. संदीप नाईक यांच्यावर मी बंधन घालणार नाही, तसेच मी संदीपचा प्रचार करणार नसल्याचं गणेश नाईक यांनी स्पष्टपणे सांगितलं.

संदीपला समजावून सांगण्याचं काम मी केलं आहे. आता कुणी काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं गणेश नाईक म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! राज ठाकरेंकडून दोन उमेदवारांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज!

शरद पवारांचा मोठा डाव; ‘हा’ बडा नेताही तुतारी हाती घेणार

अखेर सत्य उघड! अभिषेकच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री, ऐश्वर्याला देणार घटस्फोट?

तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर! पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now