देशातील सर्वात मोठी बातमी; निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारची मोठी घोषणा

On: March 11, 2024 7:06 PM
Pm Modi Announces Cut In Lpg Cylinder Prices By Rs 100
---Advertisement---

मुंबई | केंद्र सरकारने CCA अर्थात नागरीकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता सीएए कायदा देशभरात लागू होणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारकडून CCA कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय

हा कायदा पाच वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. परंतु, आता लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना केंद्र सरकारने CCA कायद्याची अधिसूचना काढली आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक 11 डिसेंबर 2019 मध्ये संसदेत पारित करण्यात आले होते. त्यानंतर एका दिवसात राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. सीएएच्या कायद्यामुळे, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानतून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन समुदायातील अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी मदत होणार आहे.

CCA कायदा काय आहे ?

या नागरिकत्व सुधारणा कायदा कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळणार आहे, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

CCA चा कायदा कोणत्याही व्यक्तीला स्वत:हून नागरिकत्व बहाल करत नाही. हा कायदा 31 डिसेंबर 2014 पर्यंत किंवा त्यापूर्वी पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशातून भारतात आले आहेत. अशा लोकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान कोणती मोठी घोषणा करणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

धोनीच्या चाहत्यांना धक्का?; हा खेळाडू होणार CSK चा कर्णधार?

अजित पवारांना सर्वांत मोठा धक्का बसण्याची शक्यता!

“फडणवीस तुम्ही चुकीच्या माणसाला…”; जरांगेंचा फडणवीसांना गंभीर इशारा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now