मोठी बातमी! मोदींच्या सभेआधी बीकेसीमधील कमान कोसळली

On: January 19, 2023 3:39 PM
---Advertisement---

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज मुंबई (Mumbai) दौरा आहे. मोदी मुंबईत विविध विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. मोदी यांच्या या दौऱ्याची भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे.

तब्बल दीड लाख लोक या मोर्चाला येणार असल्याची चर्चा आहे. याआधी सभास्थळी एक दुर्घटना घडली. बीकेसीमधील कमान कोसळली असल्याची माहिती समोर आलीये.

बीकेसीमध्ये मोदींच्या स्वागतासाठी भव्य अशी सजावट करण्यात आली आहे. मात्र त्यातीच एक कमान कोसळल्याची घटना घडली आहे. 

या घटनेत सुदैवानं कोणतीही हानी झालेली नाही. सध्या पोलीस आणि कार्यकर्त्यांकडून ही कमान हटवण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान, मुंबईतील बीकेसी मैदानावर आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा पार पडणार आहे. यावेळी मोदी विविध विकासकामांचं भूमिपूजन करणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे मोदींच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now