नाशिक | ललित पाटील (Drugs Racketter Lalit Patil) याच्याबाबत रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहे. ड्रग्स प्रकरणात ललित पाटील याला अटक करण्यात आली होती. ड्रग्स रॅकेटबद्दल हे प्रकरण दिवसेंदिवस खोलवर चालंलं आहे. आज ललित पाटीलची कस्टडीतून सुटका होणार आहे.
ललित पाटीलच्या ड्रग्स प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील तापलं आहे. राजकारणातील विरोधी पक्षनेते एकमेकांवर याबाबत टिका करत आहेत. अशात या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नाशिकमधील माजी महापौराचं नाव चौकशीतून समोर आलंय. विशेष म्हणजे ही व्यक्ती ठाकरे (Shivsena Thackeray) गटाची आहे. त्यामुळे नाशिकमध्ये एकीकडे ठाकरे गटाकडून दादा भुसे यांचं नाव घेतलं जात असताना ठाकरे गटातील माजी महापौर विनायक पांडे अडचणीत आले आहेत.
ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान पांडे यांच्या चालकाने ललित पाटील याची अपघातग्रस्त कार दुरुस्ती करण्यासाठी मदत केली होती.
एकीकडे ललित पाटील प्रकरणात ठाकरे गट सातत्याने मंत्री दादा भुसे यांचं नाव घेत आहेत. त्याचवेळी ठाकरे गटाच्या नेत्याचं नाव चौकशीत समोर आल्याने खळबळ माजलीये.
थोडक्यात बातम्या –






