Uddhav Thackeray | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाराष्ट्रातील पक्षांतराचे राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीला (MVA), विशेषतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला, गळती लागली असून, आज जळगाव (Jalgaon) येथे एक मोठा गट भाजपमध्ये (BJP) दाखल होत आहे.
माजी महापौरांसह १३ नगरसेवक भाजपच्या वाटेवर :
शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena Thackeray group) पक्षाला जळगाव (Jalgaon) महापालिकेत मोठे खिंडार पडले आहे. पक्षाचे प्रमुख नेते आणि माजी महापौर नितीन लढ्ढा (Nitin Laddha) यांच्या नेतृत्वाखाली एकूण १३ माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत हे सर्व नेते भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लढ्ढा (Nitin Laddha) आणि त्यांचे सहकारी पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र योग्य मुहूर्ताची प्रतीक्षा केली जात होती. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातो.
Uddhav Thackeray | पक्षांतराचे वारे; महायुतीतही अंतर्गत इनकमिंग :
विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून महाविकास आघाडीतील (MVA) नेत्यांचे सत्ताधारी पक्षात येण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला बसला, त्यांचे अनेक विश्वासू सहकारी शिंदे गट (Shinde group) किंवा भाजपमध्ये गेले. स्थानिक निवडणुकांपूर्वी ही गळती सुरूच आहे.
एकीकडे महाविकास आघाडी (MVA) कमकुवत होत असताना, दुसरीकडे महायुतीमध्ये (Mahayuti) देखील सर्वकाही आलबेल नाही. भाजप (BJP) आपल्याच मित्रपक्षांच्या, अर्थात शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde group) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar group) नेत्यांना पक्षात घेत असल्याचे प्रकारही घडत आहेत. यावरून शिवसेनेचे खासदार नरेश मस्के (Naresh Maske) यांनी काही काळापूर्वी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.






