फडणवीसांनी ईडीचा डाव लावताच गोपाळरावांचा आव, ताव आणि भाव कोसळला!

On: November 5, 2024 9:56 AM
Thackeray group Criticism of Gopal Shetty
---Advertisement---

Gopal Shetty | विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून सुरू असलेलं नाट्य अखेर काल (4 नोव्हेंबर) संपलं. तिकीट न मिळाल्याने महायुतीसह महाविकास आघाडीमध्येही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. अनेक इच्छुकांनी अपक्ष अर्ज भरून आपल्याच पक्षातील उमेदवाराला आव्हान दिलं होतं. काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडायला पक्ष प्रमुखांसह बड्या नेत्यांना चांगलाच घाम सुटला होता. पण काही बंडखोरांनी अर्ज मागे घेताना अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. (Gopal Shetty)

“कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवणारच”, अशी भूमिका घेणारे भाजपचे बंडखोर गोपाळ शेट्टी यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतलाय. यावरूनच शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार खिल्ली उडवण्यात आली आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून फडणवीस यांच्यासह गोपाळ शेट्टी यांच्यावर टोलेबाजी करण्यात आली आहे.

“..या एका आश्वासनावर अनेकांनी माघार घेतली”

“भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासारख्यांनी ‘बंड’ केल्याचा आव आणून उमेदवारी अर्ज भरल्याचा ‘ताव’ मारला, पण फडणवीसांनी ‘ईडी’चा डाव लावताच गोपाळरावांचा आव , ताव आणि भाव कोसळला व त्यांनी माघार घेतली,” अशा शब्दात ठाकरे गटाने फडणवीस आणि शेट्टी यांना डिवचलं आहे. (Gopal Shetty)

त्या-त्या पक्षांच्या नेत्यांनी ‘विधान परिषदा’ महामंडळांची आश्वासने दिली असतील, याची गणती नाही. शेकडो जणांना ‘तुला या वेळी विधान परिषदेत पाठवतोच. आता माघार घे!’ या एका आश्वासनावर अनेकांनी माघार घेतली. या हिशेबात राज्य विधान परिषदेतील आमदारांचा आकडा 500 वर करावा लागेल व हजारावर महामंडळे निर्माण करावी लागतील. लोकशाही ही आता निवडणुकांपुरती उरली आहे व निवडणूक सामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही. लोकांच्या नावाने सर्वांनी सर्वकाळ चालवलेली सर्वमान्य राष्ट्रीय बनवेगिरी म्हणजे आपल्याकडील निवडणुका, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

“विश्वासघातातून बनलेली सरकारे..”

“विश्वासघातातून बनलेली सरकारे पोलीस यंत्रणांचा वापर करून निवडणुकांत धाकदपटशाचा मार्ग स्वीकारताना दिसतात व निवडणूक आयोग मूकदर्शक बनून स्वस्थ बसतो. भारतीय निवडणुकांतील ढोंगबाजी व गैरप्रकार याबद्दल निवडणूक आयोग गंभीर नाही. आजचे सरकार तर याविषयी कधीच गंभीर नव्हते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंड येथे सांगितले, ‘काही झाले तरी समान नागरी कायदा आणणारच!’ गृहमंत्र्यांना आमचे सांगणे आहे, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना आधी कायद्याने वागायला सांगा. आहे तो कायदा तुम्हाला पेलवत नाही.”, असा टोला देखील ठाकरे गटाने सामनातून लगावला आहे. (Gopal Shetty)

News Title :  Thackeray group Criticism of Gopal Shetty

महत्वाच्या बातम्या –

बॉलीवूडवर शोककळा! ‘गदर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

“मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते, हीच का लाडकी बहीण योजना?”

आज विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येणार!

कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; सतेज पाटलांना मोठा धक्का

मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री शिंदेंना धक्का!

Join WhatsApp Group

Join Now