ठाकरेंचे उमेदवार ठरले! कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?

On: October 19, 2024 11:08 AM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Vidhansabha l विधानसभा निवडूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे पाच उमेदवार जवळपास निश्चित :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची महत्वाची माहिती मिळाली आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पाच उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.

या पाचही उमेदवारांना तयारी करण्याचे ठाकरेंच्या पक्षांकडून आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. या उमेदवारांना लवकरच एबी फॉर्म देखील दिले जाणार आहेत.

Vidhansabha l कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार? :

छत्रपती संभाजीनगर मध्य – किशनचंद तनवाणी
छत्रपती संभाजीनगर पश्चिम – राजू शिंदे
वैजापूर मतदारसंघ – दिनेश परदेशी
कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
सिल्लोड मतदारसंघ – सुरेश बनकर

अर्ज दाखल करण्याची तयारी करण्याच्या सूचना देखील ठाकरे गटाने दिले आहेत. वैजापूरमधून दिनेश परदेशी यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून फटाके देखील वाजवले आहेत. औरंगाबाद मध्य, सिल्लोड, औरंगाबाद पश्चिम, कन्नड, आणि पैठणच्या उमेदवाराला निवडणूक लढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

News Title – Thackeray group candidate in Chhatrapati Sambhaji Nagar

महत्त्वाच्या बातम्या-

दिवाळीपूर्वीच सोनं 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

शुक्र आणि शनीची युती ‘या’ 3 राशींना करणार धनवान, डिसेंबर महिना ठरणार भाग्याचा!

“सलमानने कधी साधं झुरळही मारलं नाही, तो माफी मागणार मागणार नाही”

आज शनीदेव कोणत्या राशींवर असणार मेहेरबान?, वाचा राशी भविष्य

आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर, भरपत्रकार परिषदेत घडलं असं काही की…

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now