Jammu Kashmir | जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) अवंतीपोरामधील त्राल येथे गुरुवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले. त्रालमध्ये अजूनही गोळीबार सुरू असून, लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
दहशतवादी आमिरचा व्हिडीओ व्हायरल
या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवादी आमिर वानीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो व्हिडिओ कॉलवरून आपल्या आईशी बोलत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर वानीची आई त्याला आत्मसमर्पण करण्याची विनंती करताना दिसत आहे, परंतु तो आपल्या आईचे म्हणणे ऐकण्यास नकार देतो.
“मुला आत्मसमर्पण कर”
व्हिडिओ कॉलमध्ये त्याची आई स्थानिक भाषेत “मुला आत्मसमर्पण कर” असे बोलताना ऐकू येत आहे, पण आमिर वानी आपल्या आईचे काहीही ऐकत नाही आणि जवानांवर गोळीबार करतो. अखेरीस सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तो मारला जातो. व्हिडिओ कॉलमध्ये जेव्हा आई आमिरला ‘मुला सरेंडर कर’ असे म्हणते, तेव्हा तो उत्तर देतो, ‘सैन्याला समोर येऊ दे, मग पाहतो’.
हा चकमकीच्या आधीचा व्हिडिओ आहे. ज्या घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, तिथूनच तो व्हिडिओ कॉलवर बोलत होता, असे समजते. व्हिडिओ कॉलवर आईशी बोलत असताना त्याच्या हातात एके-47 रायफल दिसत आहे. आमिरशी त्याची आई, बहीण आणि चकमकीत मारल्या गेलेल्या आसिफच्या बहिणीने संवाद साधला.
आसिफच्या बहिणीने त्याला विचारले होते, ‘माझा भाऊ कुठे आहे?’ आसिफ हा तोच दहशतवादी आहे, ज्याचे घर आयईडीने उडवण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, लष्कराची इच्छा होती की त्याने आत्मसमर्पण करावे, मात्र त्याने शरणागती पत्करण्याऐवजी सैन्यावर गोळी चालवली.
English Title: Terrorist Refuses Mother’s Plea to Surrender, Killed in Encounter in Tral
Drone footage from Tral, moments before these terrorists were neutralised by the Indian Army.
Look closely — that’s the fear in their eyes.
This is what it looks like when you come face to face with the Indian Armed Forces.#IndianArmy
pic.twitter.com/PWolu4jOki— Nikhil saini (@iNikhilsaini) May 15, 2025
News Title-Terrorist Refuses Mother’s Plea to Surrender, Killed in Encounter in Tral






