‘पुण्यात 2030 पर्यंत…’; आयआयटीएमच्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर

On: January 20, 2025 9:46 AM
Pune News
---Advertisement---

Pune News l जागतिक तापमान वाढ (Global Warming) होत असताना, डेंग्यूचे (Dengue) रुग्ण वाढत आहेत. कारण तापमान वाढ ही डासांसाठी (Mosquitoes) पोषक (Favorable) ठरत आहे. पुण्यात पावसाळ्यात (Monsoon) २७ अंश सेल्सियस (Degree Celsius) तापमान राहत असून, हे डासांची संख्या वाढविण्यासाठी पुरेसे ठरत आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पुण्यात २०३० पर्यंत १३ टक्के डेंग्यूने मृत्यू (Deaths) होण्याचे प्रमाण वाढेल, असे धक्कादायक (Shocking) संशोधन (Research) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (Indian Institute of Tropical Meteorology – IITM), पुणे येथे झाले आहे.

डेंग्यूच्या डासांची (Mosquitoes) अंडी (Eggs) , अळ्या (Larvae) नष्ट होण्यासाठी उपाययोजना :

या अभ्यासात (Study) असे दिसून आले की, २७° से पेक्षा जास्त उबदार तापमान आणि कमी वेळेत अधिक पाऊस होत असल्याने डासांची संख्या वाढते. विशेषतः पावसाळ्यात (जून-सप्टेंबर) मध्ये ६० टक्के आणि ७८ टक्के आर्द्रता (Humidity) असते, तेव्हा डेंग्यू डोके वर काढतो. जर एका आठवड्यात १५० मिमी पाऊस सतत पडला, तर मात्र डेंग्यूच्या डासांची अंडी, अळ्या नष्ट होतात किंवा वाहून जातात.

Pune News l शतकाच्या अखेरीस तापमान वाढणार

भारतातील तापमान आणि आर्द्रता भविष्यात आणखी वाढण्याचा अंदाज आहे, तर मान्सूनच्या पावसाचे (Monsoon Rain) स्वरूप अधिक अनिश्चित (Unpredictable), मुसळधार (Heavy Rain) ते अतिवृष्टीसह (Extreme Rainfall) विस्कळीत (Scattered) होईल. जरी अतिवृष्टीमुळे डासांच्या अळ्या नष्ट होऊ शकतात, परंतु मॉडेल (Model) दर्शविते की, उष्ण दिवसांमध्ये एकूण वाढ डेंग्यूच्या भविष्यातील बदलांवर प्रभाव टाकत आहे. कार्बन उत्सर्जनांतर्गत (Carbon Emission), पुण्यात शतकाच्या अखेरीस सरासरी तापमानात १.२ ते ३.५° से वाढ होण्याची शक्यता आहे.

पूर्वअंदाज (Prediction) देणार! :

“आम्ही हा अभ्यास केल्यानंतर पुण्याच्या आरोग्य विभागाशी (Health Department) संपर्क केला. आमचा डेटा (Data) वापरून डेंग्यूविषयी पूर्वअंदाज देण्याची प्रणाली (System) तयार केली आहे. केरळ (Kerala) आणि इतर राज्यांशी (States) देखील संपर्क केला आहे, जिथे डेंग्यू अधिक प्रमाणात आहे. पण, तेथून अजून काही प्रतिसाद आला नाही.” असे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल (Dr. Roxy Mathew Koll), हवामान वैज्ञानिक (Climate Scientist), आयआयटीएम (IITM), पुणे यांनी सांगितले.

या तापमानाचा फटका! :

पुण्यात, पावसाळ्यात २७ ते ३५° से सरासरी तापमान राहिले, तर डास वाढतात. या तापमानात डासांचे वय वाढते, अंडी घालण्यास पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे डासांचा संसर्ग (Infection) वाढतो. त्यातून डेंग्यूचा प्रसार (Spread) अधिक होतो.

डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांचे मत

“माझी पत्नी ऑगस्ट २०२४ मध्ये रुग्णालयात दाखल झाली, तेव्हा डेंग्यूच्या रुग्णांनी दवाखाना भरला होता. त्यावरून कोणीही डेंग्यूपासून सुटत नाही, हे अधिक गंभीर आहे,” असे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी सांगितले.

हवामान बदलाच्या (Climate Change) प्रभावामुळे (Impact) डेंग्यूचा आजार अधिक वाढत आहे. वाढते तापमान आणि चढ-उताराच्या मान्सूनमुळे डेंग्यू वाढत असून, पावसामुळे पुण्यातील डेंग्यू-संबंधित मृत्यू २०३० पर्यंत १३% आणि २०५० पर्यंत २३-४०% वाढू शकतात, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या संशोधनासाठी महाराष्ट्र राज्याच्या (Maharashtra State) मुख्य सचिव (Chief Secretary) सुजाता शौणक (Sujata Shaunak) यांनी सहभाग घेतला होता.

News Title : Temperature rise and the threat of Dengue; Cases in Pune to increase by 13% by 2030

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now