“माझ्यावरती अन्याय झाला…”, तेजस्विनी पंडीतकडून राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर

On: November 19, 2024 4:52 PM
tejaswini pandit
---Advertisement---

Tejaswini Pandit | मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. शिवाय सोशल मीडियावर आपली राजकीय मतं बिनधास्तपणे मांडत असते. सोशल मीडियावर तेजस्विनीची जबरदस्त फॅन फाॅलोइंग पहायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान, तेजस्विनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या या पोस्टची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

कोणती पोस्ट शेअर केली?

तेजस्विनीने (Tejaswini Pandit) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये “माझ्यावरती अन्याय झालाय हे माझ्याशी तरी कुणी बोलायचं नाही,” असं राज ठाकरे म्हणताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या या शब्दांनंतर व्हिडीओत त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे काही फोटो पहायला मिळत आहेत.

“माझ्यावरती अन्याय झालाय हे”

व्हिडीओमध्ये बोलत असताना राज ठाकरे म्हणाले की, मी कधी माझ्या चेहऱ्यावर भासू दिलं का रे, की माझ्या बाबतीत काय चाललंय? कसले हेवेदावे घेऊन बसलात रे तुम्ही, कुठे घेऊन जाणार आहात ती भांडणं?

लोकांना अशी भांडणारी, कुंठत राहणारी अशी माणसं आवडत नाही. त्यामुळे माझ्यावरती अन्याय झालाय हे माझ्याशी तरी कुणी बोलायचं नाही, असं ते या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. तेजस्विनीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, पाऊल थकलं नाही, निःशब्द. तेजस्विनीने (Tejaswini Pandit) शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

News Title : tejaswini pandit shares raj Thackeray’s video

महत्त्वाच्या बातम्या-

विनोद तावडेंनी 5 कोटी वाटले, माझ्याकडे डायरी..; विरारमध्ये बविआ-भाजपमध्ये मोठा राडा

एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका!

चंद्रकांत पाटील यांचा कमिन्सच्या कर्मचाऱ्यांशी संवादाने प्रचाराचा समारोप

कालीचरण महाराजांच्या वक्तव्यामुळे संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?

बारामतीमध्ये खळबळ; श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये धडकले पोलीस, नेमकं काय घडलं?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now