Tejasvi Ghosalkar | शिवसेना (ठाकरे गट) नेत्याच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. माजी नगरसेवक विनोद घोसाळकर (Tejasvi Ghosalkar) यांच्या हत्येनंतर शिवसेना पक्षाने त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना शिवसेनेत महत्त्वाची जबाबदारी दिली होती. मात्र, उत्तर मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली.
तेजस्वी घोसाळकरांचा राजीनामा
तेजस्वी घोसाळकर (Tejasvi Ghosalkar) यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना हा मोठा फटका मानला जात आहे. त्यातच, तेजस्वी घोसाळकर यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. तसेच, “सध्या मी काही सांगणार नाही. पण मी गद्दारी केलेली नाही, अद्याप कुठल्याही पक्षात जाण्याचा मी विचार केला नाही,” असे तेजस्वी घोसाळकर यांनीसांगितले.
उद्धव ठाकरेंची घेतली भेट
“माझी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. माझ्या ज्या काही तक्रारी होत्या, त्या मी पक्षप्रमुखांकडे मांडल्या आहेत. त्याबद्दल त्यांनी काही उत्तरे दिली, काही उत्तरे अजून येणे बाकी आहेत. त्यामुळे, सध्या मी काही सांगणार नाही. नाराजी दूर झाली का, हे तुम्हाला लवकरच समजेल,” असे तेजस्वी घोसाळकर यांनी स्पष्ट केले. “कालच्या स्तरावर काही गोष्टी स्पष्ट होणे गरजेचे होते. पण, त्या झाल्या नसल्याने मला ‘मातोश्री’वर यावे लागले. ज्या काही गोष्टी होत्या, त्या उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्या आहेत. मी अजून कुठल्याही पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. मी गद्दारी केलेली नाही, मी या सगळ्यांवर विचार करून सांगेन,” असे तेजस्वी घोसाळकर (Tejasvi Ghosalkar) यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापालिका निवडणुकांपूर्वीच उत्तर मुंबईतील स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल अनेक वेळा नाराजी व्यक्त करूनही पक्षाने दखल न घेतल्यामुळे राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर ‘मातोश्री’वरून त्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार, त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाच्या सर्व पदांचा तेजस्विनी घोसाळकर यांनी राजीनामा दिला आहे.
News Title-Tejasvi Ghosalkar Meets Uddhav Thackeray






