“मला पुन्हा सांगायला आवडेल की माझ्या आयुष्यात…”, तेजश्री प्रधानचा लग्नाबाबत खुलासा

On: January 29, 2025 1:08 PM
tejashree pradhan
---Advertisement---

Tejashri Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यातील अनेक पैलू उलगडले आहेत. घटस्फोटानंतर खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच व्यक्त होताना दिसली. एवढेच नाही, तर आयुष्यात येणारा ‘पसंदीदा मर्द’ कसा असेल, यावर देखील अभिनेत्रीने भाष्य केले आहे.

‘होणार सून मी ह्या घरची’ (Honar Sun Mi Hya Gharchi) या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असताना तेजश्रीने अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत लग्न केले होते. पण, दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. आता अभिनेत्रीने प्रेमाबद्दल देखील मोठे वक्तव्य केले आहे.

पुन्हा प्रेमात पडण्याची इच्छा-

“तुझ्या आयुष्यात जे काही झाले, त्यामुळे प्रेमाकडे, नात्याकडे पाहण्याचा तुझा दृष्टीकोन बदलला आहे का?” असा प्रश्न तेजश्रीला (Tejashri Pradhan) विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “मला तसेच पुन्हा प्रेमात पडायचे आहे. मला ते पिंक वर्ल्ड (Pink World) पाहायचे आहे. मला तसेच सोशल मीडियावर छान फोटो टाकायचे आहेत. मला सगळे करायचे आहे. प्रेमाबद्दल माझा दृष्टिकोन बदललेला नाही…”

आयुष्यात येणाऱ्या पुरुषाबद्दल अपेक्षा-

“मला पुन्हा सांगायला आवडेल की मला माझ्या आयुष्यात एखाद्या माणसाला एवढे मोठे करायचे नाही, जो माझ्या आयुष्यातील इतक्या चांगल्या भावना (Feelings) घेऊन जाईल,” असे देखील तेजश्री (Tejashri Pradhan) म्हणाली. सध्या सोशल मीडियावर ‘पसंदीदा मर्द’ तुफान ट्रेंड होत आहे. यावर अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा तुम्ही पंचविशीत असता तेव्हा तुम्हाला सगळे परफेक्ट हवे असते.

आयुष्याचे अनुभव जेव्हा वहीच्या पंधराव्या पानापर्यंत उतरले जातात, तेव्हा लक्षात येते मला फक्त एक खरा माणूस हवा आहे. जो माझ्यासोबत खरा वागणार आहे. कमिटेड असणार आहे… बाकी सब हो जाएगा…” असे म्हणत तेजश्रीने तिच्या आयुष्यात येणारा ‘पसंदीदा मर्द’ कसा असावा हे सांगितले आहे.

घटस्फोटावर काय म्हणाली तेजश्री?

अभिनेत्री म्हणाली, “मला असे वाटते दोन चांगली माणसे दोन चांगले लाईफ पार्टनर असणे गरजेचे नाही… माझ्या आयुष्यात जे काही घडले त्यासाठी मला त्या माणसाला दोषी ठरवायचे नाही. ज्या व्यक्तीने मला वेदना दिल्या आहेत, किंवा माझ्यामुळे त्या व्यक्तीला वेदना झाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)

त्या व्यक्तीला मला मोठे करायचे नाही.” “हा प्रवास ठरलेला होता. एखादे नाते तुटणे ही फार वाईट गोष्ट आहे. फक्त दोघांसाठी नाही तर, दोन्ही कुटुंबासाठी नाते तुटणे ही वाईट गोष्ट असते,” असे म्हणत तेजश्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या.या मुलाखतीतून तेजश्री प्रधानने घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल आणि तिच्या प्रेमाबद्दलच्या अपेक्षांबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. तिच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

News Title : Tejashri Pradhan opens up about her personal life

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now