दात होतील चमकदार! ‘हे’ 4 घरगुती उपाय लगेच करून पाहा 

On: March 18, 2025 12:41 PM
Teeth Whitening Best Home Remedies
---Advertisement---

Teeth Whitening | पांढरेशुभ्र आणि निरोगी दात प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, योग्य काळजी न घेतल्यास दात पिवळे पडतात आणि किडही लागू शकते. यामुळे हसतानाही संकोच वाटतो. नियमित ब्रश केल्याने काही प्रमाणात फायदा होतो, पण काही नैसर्गिक उपाय करून तुम्ही तुमचे दात अधिक चमकदार आणि स्वच्छ ठेवू शकता. (Teeth Whitening)

1. हळद, मीठ आणि मोहरीचं तेल

हळद, मीठ आणि मोहरीचं तेल एकत्र करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट दिवसातून दोनदा ब्रश करण्यासाठी वापरल्यास दात अधिक स्वच्छ आणि चमकदार होतात. यामुळे दातांवरील पिवळसर थर हळूहळू कमी होतो.

2. संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीत नैसर्गिक अॅसिड आणि व्हिटॅमिन C असते, जे दातांसाठी फायदेशीर ठरते. संत्र्याची ताजी साल दातांवर घासल्याने दात स्वच्छ होतात आणि त्यांचा पांढरटपणा टिकून राहतो. हा उपाय दिवसातून दोन वेळा केल्यास दात अधिक चमकदार होतात.

3. लिंबाची साल

लिंबात असलेल्या सिट्रिक अ‍ॅसिडमुळे दातांवरील डाग दूर होतात आणि ते अधिक स्वच्छ होतात. लिंबाची साल दातांवर हलक्या हाताने घासल्याने नैसर्गिकरीत्या दातांचा रंग सुधारतो. मात्र, हा उपाय जास्त वेळ करू नये, कारण जास्त प्रमाणात अ‍ॅसिडिक घटक दातांच्या एनॅमलवर परिणाम करू शकतात. (Teeth Whitening)

4. नारळ तेलाचा उपयोग

नारळाचं तेल ओइल पुलिंगसाठी उत्कृष्ट मानलं जातं. चमचाभर नारळ तेल तोंडात घेऊन 15-20 मिनिटं धरावं आणि नंतर थुंकून टाकावं. यामुळे दातांवरील जंतू नष्ट होतात, पिवळसरपणा कमी होतो आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते.

मात्र, जर घरगुती उपाय करूनही दातांचा पिवळसरपणा जात नसेल, दात दुखत असतील, हिरड्या सुजल्या असतील किंवा तोंडाला दुर्गंधी येत असेल, तर दंततज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य उपचारांमुळे तुमचे दात अधिक निरोगी आणि चमकदार राहतील.

Title : Teeth Whitening Best Home Remedies

 

Join WhatsApp Group

Join Now