रोहित शर्मानंतर कोण होईल भारताचा कसोटी कर्णधार? ‘या’ खेळाडूंची जोरदार चर्चा

On: May 8, 2025 10:32 AM
Team India
---Advertisement---

Team India New Test Captain | भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने ७ मे २०२५ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने मागील तीन वर्षांत कसोटीत चांगली कामगिरी केली. आता त्याच्या निवृत्तीनंतर पुढचा कसोटी कर्णधार कोण असणार? हा प्रश्न सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. सध्या शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर ही प्रमुख नावे चर्चेत आहेत. त्यापैकी शुभमन गिल कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Team India New Test Captain)

शुभमन गिल – भारताचा भविष्यकालीन कर्णधार? :

२५ वर्षीय शुभमन गिल (Shubhman Gill) गेल्या काही वर्षांत भारताच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग ठरला आहे. त्याने काही मालिकांमध्ये उपकर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. सध्या गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे आणि त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. यंदाच्या हंगामात त्याने ११ सामन्यांत ५०८ धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. (Team India New Test Captain)

गिलने आतापर्यंत ३२ कसोटीत १८९३ धावा केल्या आहेत. तरुण वयात नेतृत्व मिळाल्यास तो दीर्घकाळ भारतीय संघासाठी स्थिर कर्णधार ठरू शकतो.

Team India New Test Captain | बुमराह, राहुल, पंत आणि अय्यर मागे का? :

जसप्रीत बुमराह (Bumrah) हा देखील कर्णधारपदासाठी योग्य पर्याय मानला जातो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने एक कसोटीमध्ये नेतृत्वही केलं होतं. मात्र, सततच्या दुखापतींमुळे त्याची उपलब्धता शंभर टक्के राहिलेली नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामन्यांत त्याला विश्रांती देण्याची शक्यता आहे.

केएल राहुल, ऋषभ पंत, आणि श्रेयस अय्यर यांचाही विचार होऊ शकतो, मात्र ते सध्या संघात सातत्याने उपलब्ध नाहीत किंवा त्यांच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह आहेत.

पुढील कसोटी मालिकांसाठी अपेक्षित निर्णय :

भारताला लवकरच इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याआधीच नवीन कर्णधाराची निवड होणे आवश्यक आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, गिलचे नाव पुढे येण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

News Title: Who Will Be India’s Next Test Captain After Rohit Sharma? Shubman Gill Leads the Race

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now