IRCTC New Rules | रेल्वेने तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत तात्काळ बुकिंगसाठी ‘आधार OTP पडताळणी’ (authentication) सक्तीची केली आहे. IRCTC च्या वेबसाईट किंवा अॅपवरून तात्काळ तिकीट बुक करताना आता प्रवाशाचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. अन्यथा OTP मिळणार नाही आणि बुकिंग पूर्ण होणार नाही. (IRCTC New Rules)
हा बदल 17 जुलै 2025 पासून संपूर्ण देशभर लागू करण्यात आला असून, यामुळे प्रवाशांच्या खात्रीशीर तिकिटासाठीचा मार्ग सुकर झाला आहे. विशेषतः एजंटांनी सॉफ्टवेअरच्या मदतीने चुटकीसरशी तिकीट बुक करून सामान्य प्रवाशांसाठी अडथळा निर्माण करण्याच्या प्रकारांवर आता आळा बसणार आहे.
तुमच्यासाठी महत्त्वाचे बदल काय आहेत? :
आधार OTP पडताळणी अनिवार्य :
– IRCTC अकाऊंटमध्ये आधार लिंक नसल्यास तात्काळ तिकीट बुक होणार नाही.
– बुकिंगच्या वेळी मोबाईलवर येणारा OTP टाकल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
– दुसऱ्याच्या नावाने तिकीट बुक करत असाल तरी संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांक आणि OTP आवश्यक असेल.
एजंटांसाठी तात्काळ बुकिंगवर मर्यादा :
– सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत AC क्लाससाठी, आणि 11 ते 11.30 पर्यंत स्लीपर क्लाससाठी एजंटांना बुकिंग करता येणार नाही.
– ही वेळ आता फक्त सर्वसामान्य प्रवाशांसाठी राखीव राहणार आहे.
IRCTC New Rules | काउंटर बुकिंगवरही OTP पडताळणी :
रेल्वे स्थानकावरील आरक्षण काऊंटरवरून तिकीट घेताना देखील आधार क्रमांक आणि OTP आवश्यक असेल. तसेच मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तरच बुकिंग होणार आहे. रेल्वे प्रशासनानुसार, हा बदल फक्त तात्काळ तिकीट बुकिंगसाठी लागू आहे.
याशिवाय सामान्य किंवा प्रतीक्षा यादीतील (waiting list) तिकिटांसाठी सध्या आधार पडताळणी आवश्यक नाही. मात्र भविष्यात ही प्रक्रिया सर्व तिकीट बुकिंग पद्धतींवर लागू केली जाऊ शकते, असा इशाराही रेल्वेने दिला आहे.
OTP किंवा आधार लिंक नसेल तर काय कराल? :
IRCTC हेल्पलाईन : 139
UIDAI आधार हेल्पलाईन : 1947
जवळच्या रेल्वे स्थानकाच्या आरक्षण काउंटरवर भेट देऊन मदत मिळवता येते.






