टाटा नेक्सॉन बनली देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार; जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

On: October 29, 2025 4:42 PM
Tata Nexon
---Advertisement---

Tata Nexon | भारतीय वाहन बाजारात टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपली दमदार छाप सोडली आहे. सप्टेंबर 2025 महिन्यात टाटा नेक्सॉन ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली असून, या यशानंतर कंपनीने या लोकप्रिय एसयूव्हीमध्ये अत्याधुनिक एडीएएस (ADAS) सेफ्टी तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. यामुळे ही कार आता अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनली आहे.

2017 मध्ये पहिल्यांदा सादर झालेल्या टाटा नेक्सॉनने आजवर डिझाइन, परफॉर्मन्स आणि सुरक्षिततेच्या बाबतीत नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत. कंपनीच्या मते, सप्टेंबर महिन्यातील विक्री विक्रम ग्राहकांच्या विश्वासाचा पुरावा आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे सीसीओ विवेक श्रीवत्स यांनी सांगितले की, “रेड #डार्क एडिशन आणि एडीएएससह आम्ही नेक्‍सॉनला अधिक प्रगत आणि प्रभावी बनवत आहोत.”

अधिक सुरक्षिततेसह एडीएएस तंत्रज्ञानाचा समावेश :

टाटा नेक्सॉन ही भारतातील एकमेव SUV आहे जिने जीएनसीएपी (GNCAP) आणि बीएनसीएपी (BNCAP) या दोन्ही संस्थांकडून 5-स्टार रेटिंग मिळवली आहे. आता या वाहनात समाविष्ट करण्यात आलेल्या एडीएएस तंत्रज्ञानामुळे तिची सुरक्षितता आणखी वाढली आहे. या तंत्रज्ञानामध्ये ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन किप असिस्ट, ट्रॅफिक साइन रेकग्निशन आणि हाय बीम असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत, जी ड्रायव्हरला सतर्क ठेवतात आणि अपघाताचा धोका कमी करतात.

या अद्ययावत वैशिष्ट्यांमुळे नेक्सॉन केवळ एक सुरक्षित SUV नव्हे तर स्मार्ट ड्रायव्हिंगचा अनुभव देणारे वाहन ठरले आहे. टाटा मोटर्सच्या या इनोव्हेटिव्ह अपडेटमुळे वाहन सुरक्षिततेचा नवा मानदंड निश्चित झाला आहे.

Tata Nexon | किंमत तपशील :

ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादाचा आनंद साजरा करण्यासाठी टाटा मोटर्सने “रेड #डार्क एडिशन” लाँच केली आहे. ही आवृत्ती पेट्रोल, डिझेल आणि CNG या तिन्ही पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध असून, तिची किंमत 12.44 लाख रुपयांपासून सुरू होते.

या कारच्या डिझाइनमध्ये काळ्या रंगाचे ग्रॅनाइट ब्लॅक फिनिशिंग, लाल अॅक्सेंट्स, प्रीमियम इंटीरियर आणि हवेशीर रेड लेदरेट सीट्स यामुळे लक्झरी आणि स्टाइलचा अनोखा संगम साधण्यात आला आहे. दमदार परफॉर्मन्स, आकर्षक लुक आणि उत्कृष्ट सुरक्षा या गुणांच्या जोरावर नेक्सॉनने पुन्हा एकदा भारतीय ग्राहकांचे मन जिंकले आहे.

News Title: Tata Nexon becomes India’s best-selling car in September 2025 – Price, features, and ADAS safety details

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now