“तुझाही संतोष देशमुख केला जाईल”; सत्ताधारी आमदाराच्या पुतण्यांना थेट धमकी

On: December 24, 2024 8:10 AM
Tanaji Sawant nephew has been threatened
---Advertisement---

Tanaji Sawant | महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. अशात महायुतीमधील शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या दोन पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. तुमचा ही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल, अशी धमकी देण्यात आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

तानाजी सावंत यांचे पुतणे तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना थेट धमकी देण्यात आली आहे. तेरणा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद पाकीटामध्ये 100 रुपयांच्या नोटेसोबत धमकीची चिठ्ठी देण्यात आली.

तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, ऊस ट्रॅक्टर चालकाला तेर-ढोकी रोडवर मुळेवाडी पाटीजवळ अडवत दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी हे बंद पाकीट सोपवलं. टपाल आहे, असं सांगून हे पाकिट तेरणा कारखान्यावर सुरक्षा रक्षकाकडे देण्यास या चालकाला सांगण्यात आलं. हे पाकीट उघडून पाहिले असता त्यात तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल, असं एका चिठ्ठीमध्ये लिहिलं असल्याचं आढळून आलं.

या प्रकरणी खळबळ उडाली आहे. यानंतर तेरणा कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास केला जातोय. ही धमकी कुणी आणि का दिली?, याबाबत कोणताही खुलासा अद्याप झाला नाही. (Tanaji Sawant )

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार करण्यात आला होता. दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरुन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाने केला होता. अशात त्यांना अशी थेट धमकी देण्यात आली आहे.

News Title – Tanaji Sawant nephew has been threatened

महत्त्वाच्या बातम्या-

मुंडेंना पक्षातूनच मोठा धक्का, राष्ट्रवादीचा नेता अजित पवारांना म्हणाला ‘बंदोबस्त करून…’

इच्छापूर्ती ते नात्यात गोडवा, आज ग्रहमान ‘या’ राशींना देणार साथ!

‘छगन भुजबळांबद्दल अजित पवारांनीच मला…’, देवेंद्र फडणवीसांकडून मोठा खुलासा!

विनोद कांबळींची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

दलित असल्याने त्याची हत्या पोलिसांनीच केली; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

Join WhatsApp Group

Join Now