‘या’ राज्यात हिंदीवर बंदी! गाणी, होर्डिंग्ज आणि बोर्ड्सवरही बंदी

On: October 15, 2025 6:12 PM
Tamilnadu Hindi Ban
---Advertisement---

Tamilnadu Hindi Ban | तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकारने हिंदी भाषेच्या वापरावर बंदी घालणारे विधेयक सादर करण्याची तयारी केली आहे. या विधेयकानुसार राज्यात हिंदीतील होर्डिंग्ज, बोर्ड, चित्रपट आणि गाणी यावर संपूर्ण बंदी घालण्यात येणार आहे. तामिळनाडू विधानसभेचं विशेष अधिवेशन 14 ऑक्टोबरपासून सुरू झालं असून, 17 ऑक्टोबरला ते संपणार आहे. याच अधिवेशनात हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. (Tamilnadu Hindi Ban)

तीन भाषा धोरणावरून केंद्राशी संघर्ष :

राज्यात हिंदी भाषेच्या वापरावरून तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारमध्ये दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्राच्या ‘तीन भाषा धोरणा’ला (Three Language Policy) तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, राज्यातील लोकांवर जबरदस्तीने हिंदी लादली जात आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, तामिळनाडूचं ‘द्विभाषिक धोरण’ (तमिळ आणि इंग्रजी) हे शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींसाठी अधिक प्रभावी आहे.

यापूर्वीही स्टॅलिन यांनी 2025-26 च्या अर्थसंकल्पात रुपया चिन्हाऐवजी ‘रुबाई’ या तमिळ शब्दाचे पहिले अक्षर वापरून हिंदीविरोधी भूमिका स्पष्ट केली होती. या निर्णयामुळे हिंदीविरोधी भावना पुन्हा एकदा उफाळून आल्या आहेत.

Tamilnadu Hindi Ban | “हिंदीने 25 भाषा संपवल्या” – स्टॅलिनचा आरोप :

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी यापूर्वी हिंदीवर जोरदार हल्लाबोल करताना म्हटलं होतं की, गेल्या शंभर वर्षांत हिंदीच्या जबरदस्तीमुळे 25 भारतीय भाषा नामशेष झाल्या आहेत. त्यांनी X वर लिहिलं, “भोजपुरी, मैथिली, अवधी, ब्रज, बुंदेली, गढवाली, कुमाऊनी, मगही, मारवाडी, माळवी, छत्तीसगढी आणि इतर अनेक भाषा आता अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत.” (Tamilnadu Hindi Ban)

स्टॅलिन यांनी पुढे म्हटलं की, “हिंदी हा मुखवटा आहे आणि संस्कृत हा त्यामागचा चेहरा आहे. त्यामुळे या अन्यायकारक लादणीविरुद्ध आवाज उठवला जाईल.” या विधानामुळे भाजप आणि द्रमुक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

News Title: Tamil Nadu Government to Ban Hindi – Bill Targets Songs, Films, and Hoardings

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now