Talegaon-Chakan Highway | अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून 25 किलोमीटर लांबीचा चारपदरी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच राबविली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सहा हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (Talegaon-Chakan Highway)
तळेगाव-चाकण चौपदरीकरणासाठी तरतूद
वडगाव मावळ: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याशी संबंधित तळेगाव-चाकण-शिक्रापूर (Talegaon-Chakan-Shikrapur) मार्गावरील तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. यामुळे तळेगाव ते चाकण मार्गावर होणारी वाहतूककोंडी लवकरच सुटणार आहे.
प्रकल्पाचा खर्च आणि निविदा प्रक्रिया
पुणे ते शिरूर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे पवार यांनी अर्थसंकल्प सादरीकरणावेळी सांगितले. निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या प्रयत्नांना यश
तळेगाव ते चाकण दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करणे, फ्लायओव्हर (Flyover) बांधणे यासाठी आमदार सुनील शेळके हे आमदारकीच्या पहिल्या टर्मपासून प्रयत्नशील होते. (Talegaon-Chakan Highway)
युद्धपातळीवर निर्णयाची आवश्यकता
शिरूर आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दोन प्रमुख मार्गासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. पुणे-शिरूर मार्गाच्या 54 किलोमीटर अंतराच्या उन्नत रस्त्यासाठी सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तळेगाव-चाकण रस्त्यासंदर्भात 7 वर्षांपूर्वी घोषणा झाली असली, तरी विविध कारणांमुळे प्रकल्प रखडलेला होता.
Title : Talegaon-Chakan Highway Traffic Congestion to be Resolved Soon






