पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; ताबडतोब ‘या’ 5 गोष्टींची काळजी घ्या!

Zika Virus l पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहरात यावर्षी झिका विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. एरंडवणे येथील 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांची 15 वर्षांची मुलगी झिका आजराने ग्रस्त झाली आहेत. मात्र सध्या त्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी :

पुण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी परिसराला भेट दिली आहे. या रुग्णाचे आई-वडील, पत्नी आणि मुलगी असे त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आहेत. यापैकी आई-वडील आणि पत्नीमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.

पुढील 14 दिवस आरोग्य विभाग या परिसराचे सर्वेक्षण करणार आहे. कोणाला काही लक्षणे आढळल्यास त्याची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय संघाकडून कीटकनाशकांची फवारणी देखील करण्यात आली आहे. तापाने त्रस्त असलेल्या नागरिकांनी जवळच्या पीएमसी रुग्णालयात जाऊन झिका विषाणू संसर्गाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.राजेश दिघे यांनी केले आहे. तसेच डासांची उत्पत्ती रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Zika Virus l या 5 गोष्टींची काळजी घ्या! :

– झिका विषाणूपासून बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका. कारण पाणी साचलेल्या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे नागरिकांनी घराभोवती पाणी साचणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यावी.

– झिका विषाणू हा संसर्गजन्य आजार आहे. झिका विषाणूला बळी न पडण्यासाठी शरीर संपूर्ण झाकले जाईल असे कपडे घाला, जेणेकरून डास चावणार नाही याची काळजी घ्या.

– जर तुम्हाला झिका व्हायरसला बळी पडायचं नसल्यास दिवसा देखील डास प्रतिरोधक औषधांचा वापर जास्तीस्त जास्त करा. कारण डास प्रतिरोधक औषध फायद्याचे ठरू शकते.

– डासांपासून बचाव करण्यासाठी रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा, जेणेकरून दास तुम्हाला चावणार नाहीत.

– सर्वात महत्वाचं म्हणजे गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे.

News Title – Take care of these things to avoid Zika virus!

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात ‘झिका’चे रुग्ण आढळल्याने खळबळ, काय आहेत या आजाराची लक्षणं?

पुण्यात झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ

विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी आज मतदान; आता महायुती की महाविकास आघाडी?

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ कंपनीचा IPO बाजारात दाखल

या राशीच्या व्यक्तींवर आर्थिक संकट ओढवणार