सहमतीने दोघांचे शरीर संबंध? दत्ता गाडेला कोर्टात हजर केल्यावर काय काय घडलं?

On: February 28, 2025 7:21 PM
datta gadee
---Advertisement---

Swargate Crime News | पुणे (Pune) येथील स्वारगेट बसस्थानकावर 25 फेब्रुवारी रोजी एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने राज्यभरात तीव्र संताप निर्माण केला आहे. या घटनेतील प्रमुख आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला अखेर 72 तासांच्या शोधानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले.

शुक्रवारी संध्याकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली. मात्र, आरोपीच्या वकिलांनी वेगळाच दावा करत बचाव केला. सरकारी वकिलांनी हा दावा फेटाळून लावत आरोपीविरोधात ठोस पुरावे सादर केले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आरोपीच्या वकिलांचा मोठा दावा-

न्यायालयात झालेल्या युक्तीवादादरम्यान आरोपीचे वकील वजीदखान बीडकर (Wajidkhan Bidkar) आणि साजिद खान (Sajid Khan) यांनी भक्कम बचाव करताना असा दावा केला की, पीडित महिला स्वतःहून बसमध्ये गेली होती. तसेच, दोघांमध्ये परस्पर संमतीने संबंध झाले असल्याचा युक्तिवाद केला. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी वकिलांनी केली.

यासोबतच आरोपीचे फोटो माध्यमांमध्ये समोर आले आहेत, मग (Swargate Crime News) त्याला बुरखा घालून कोर्टात का आणले, असा सवाल उपस्थित करत आरोपीच्या वकिलांनी पोलीस कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपीवर पूर्वी काही गुन्हे दाखल असले तरी त्याच्या विरोधातील कोणताही गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार ठरवू शकत नाही, असे वकिलांनी सांगितले.

सरकारी वकिलांचा प्रतिवाद-

सरकारी (Swargate Crime News) वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा दावा जोरदार फेटाळला. सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आले की, आरोपीने पीडित महिलेला “ताई” म्हणत फसवले आणि गावाकडे जाणारी बस दाखवण्याच्या बहाण्याने बसमध्ये बसवले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर आधीपासूनच 6 गुन्हे दाखल आहेत, त्यातील 5 प्रकरणांमध्ये फिर्यादी महिला आहेत. त्यामुळे आरोपीचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात नमूद केले.

तपासासाठी पोलिसांना कोठडीची गरज-

या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीची 14 दिवसांची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. आरोपीने यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत का, याची तपासणी करायची आहे.

तसेच, गुन्हा केल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता, याचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्याच्या वेळी आरोपीकडे मोबाईल होता, त्याचा फॉरेन्सिक तपास करायचा आहे. या सर्व कारणांमुळे आरोपीला दीर्घ पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाने केली. मात्र, कोर्टाने आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

News Title : Swargate Crime News important update by judge

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now