पतीच्या पराभवानंतर स्वरा भास्करची पोस्ट; म्हणाली, “EVM मध्ये घोटाळा..”

On: November 24, 2024 10:47 AM
swara bhaskar suspects evm scam
---Advertisement---

Swara Bhaskar | या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये झालेल्या लढाईत जनतेने महायुतीला विजयाचा कौल दिला आहे. मविआमधील अनेक बड्या नेत्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिल्यांदाच फहाद खान हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. फहाद खान हे अभिनेत्री स्वरा भास्करचे पती असून त्यांचा दारुण पराभव झाला आहे. (Swara Bhaskar)

फहाद खान अणूशक्ती नगर येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्याविरोधात येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. ‘अनुशक्ती नगर’ मतदारसंघात सना मलिक यांचा विजय झाला आहे. सना मलिक या नवाब मलिक यांच्या कन्या आहेत.

पती फहाद अहमद यांच्या पराभवानंतर अभिनेत्री स्वरा भास्करची पोस्ट चर्चेत आली आहे. तिने निवडणुकीत EVM मध्ये घोटाळा झाल्याची शंका व्यक्त केली आहे. अभिनेत्रीची (Swara Bhaskar) ही पोस्ट तूफान व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांच्या देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

स्वरा भास्करची पोस्ट-

एक्सवर (ट्विटर) स्वरा भास्कर हिने पोस्ट केली आहे. ‘मतदान संपूर्ण दिवस असूनही ईव्हीएम मशीन 99% चार्च कसं होऊ शकतं? यावर निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. अणुशक्ती नगर विधानसभेत 99% चार्ज मशीन उघडल्याबरोबर भाजप समर्थित राष्ट्रवादीला मते कशी मिळू लागली?’ अशी पोस्ट स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिने केली आहे. पोस्टवर नेटकरी आता प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

महायुती vs महाविकास आघाडी

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत एकूण 288 जागांपैकी 234 जागांवर महायुतीने बाजी मारली. तर, महाविकास आघाडीला केवळ 50 जागा जिंकता आल्या.महायुतीमध्ये भाजपाला 132, शिवसेनेला (शिंदे) 57, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) 41 जागा मिळाल्या आहेत.

तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) 20, काँग्रेसला 16 व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 10 जागा जिंकल्या आहेत. भाजपाला बहुमतासाठी केवळ 13 आमदारच कमी पडत आहेत. तर, यावेळी राज्यात पहिल्यांदाच विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना कामकाज करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

News Title –  swara bhaskar suspects evm scam

महत्त्वाच्या बातम्या-

विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात जाणार?, ‘त्या’ पोस्टने खळबळ

पवार vs पवार सामना झालेल्या ‘त्या’ 40 जागांचा निकाल काय लागला?

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?, पाहा संपूर्ण आकडेवारी

आज ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ, देवी लक्ष्मी आर्थिक अडचणी करणार दूर!

मोठी बातमी! अटीतटीच्या लढतीमध्ये रोहित पवार विजयी, राम शिंदेंचा ‘इतक्या’ मतांनी पराभव

Join WhatsApp Group

Join Now