देशात आढळला पहिला मंकीपॉक्स संशयित रुग्ण?, ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

On: September 9, 2024 8:32 AM
suspected monkeypox patient found in country
---Advertisement---

Monkeypox | कोरोनानंतर जगभरात आणखी एका व्हायरसने चिंता वाढवली आहे. Mpox म्हणजेच मंकीपॉक्सची रुग्णसंख्या जगभरात झपाट्याने वाढत आहे. यामुळे अवघ्या जगभरात चिंतेचे वातावरण आहे. मंकीपॉक्स विषाणूची वाढती रुग्णसंख्या पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. (Monkeypox )

अलिकडेच पाकिस्तानमध्ये या संसर्गाची प्रकरणे समोर आली.यानंतर भारतातही सतर्कता बाळगली जात आहे.अशात देशात मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. हा रुग्ण परदेशातून आला असून त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या रुग्णाच्या ब्लड टेस्टची रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.

देशात हा पहिला संशयित रुग्ण आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीमध्ये या विषाणूच्या संसर्गाशी संबंधित लक्षणे दिसून आली आहेत. संबंधित रुग्णाला तात्काळ वेगळे करून आवश्यक चाचण्यांसाठी पाठवण्यात आले. मिळालेल्या महितीनुसार, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) येथे रुग्णाचे नमुने तपासले जात आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

देशात हा संशयित रुग्ण आढळल्याने खबरदारी बाळगली जात आहे. या लेखात या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. याद्वारे तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. (Monkeypox )

Mpox हा व्हायरस म्हणजे काय?

Mpox विषाणू हा मंकीपॉक्स व्हायरस म्हणून ओळखला जातो. यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, लिम्फ नोड्स सुजणे, ताप आणि फोड येणे. बऱ्याच प्रमाणात, हे कांजिण्या सारखे आहे.(Mpox)

Monkeypox  ची लक्षणे काय आहेत?

ताप
थकवा
डोकेदुखी
थंडी जाणवणे
स्नायू दुखणे
सुजलेल्या लिम्फ नोड्स
पू भरलेली पुरळ(Mpox)

Monkeypox टाळण्यासाठी उपाय-

संक्रमित जनावरांपासून दूर राहा.
संक्रमित लोकांशी जवळचा संपर्क टाळा.
साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा.
सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला.

News Title – suspected monkeypox patient found in country

महत्त्वाच्या बातम्या-

महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींवर बरसणार सुखाच्या सरी, मिळेल शुभवार्ता

काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का; ‘हा’ नेता करणार घरवापसी?

गणेश चतुर्थीनिमित्त सरकारने घेतला मोठा निर्णय!

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

दीपिकाच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

Join WhatsApp Group

Join Now