सैफवरील हल्ल्यामागे शाहीदचा हात, पोलिसांच्या खुलाशाने खळबळ

On: January 17, 2025 5:44 PM
Saif Ali Khan Attack
---Advertisement---

Saif Ali Khan Attack l अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिपेश त्रिपाठी, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद नावाच्या या संशयिताला मुंबईतील ताडदेव पोलिसांनी गिरगाव येथील फॉकलंड रोड येथून ताब्यात घेतले आहे. शाहिदवर यापूर्वी घरफोडीचे ४-५ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

झोपेतील सैफवर सहा वेळा चाकूने वार; मुलांच्या खोलीत घडली घटना

बुधवारी (१५ जानेवारी) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास सैफच्या घरात एक चोर घुसला. सैफच्या मुलांना सांभाळणाऱ्या बाईने त्याला पाहिले आणि आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून सैफ जागा झाला आणि त्याने चोराशी झटापट केली. झटापटी दरम्यान, चोराने सैफवर चाकूने सहा वेळा वार केले. या हल्ल्यात सैफच्या घरातील मोलकरीणही किरकोळ जखमी झाली. धक्कादायक बाब म्हणजे, मुलांच्या खोलीत ही घटना घडली.

Saif Ali Khan Attack l सैफच्या पाठीच्या मणक्यातून काढला चाकूचा तुकडा

सैफच्या पाठीवर आणि मानेजवळ झालेल्या दोन जखमा गंभीर होत्या. सैफच्या मणक्यावर वार केल्यानंतर चाकूचा २.५ इंचाचा तुकडा तुटून मणक्याजवळ अडकला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे हा तुकडा काढून टाकला.

शाहिदची कसून चौकशी सुरू; हल्ल्यामागील कारण अस्पष्ट

सध्या पोलीस शाहिदला संशयित मानून त्याची कसून चौकशी करत आहेत. मात्र, शाहिद हाच सैफवर हल्ला करणारा व्यक्ती आहे की नाही याची अधिकृत पुष्टी अद्याप पोलिसांनी केलेली नाही. या हल्ल्यामागील कारणही अद्याप अस्पष्ट आहे.

News Title: Suspect in Saif Ali Khan Attack Arrested; Accused Has Prior Burglary Cases

महत्वाच्या बातम्या- 

सोनं खरेदी करणाऱ्यांना घाम फुटला; २४ कॅरेट ‘इतक्या’ हजारांच्या उंबरठ्यावर

14 दिवस मध खाल्ल्यास होतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल

सैफनंतर शाहरुख खान टार्गेटवर?; ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना संशय

आधार कार्डवर मिळतं 2 लाखांचं कर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती…

भाजप आमदाराला पुत्रशोक, लेकाच्या अचानक मृत्युने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now