‘…तर थू आहे माझ्या’; सुषमा अंधारेंचं ‘ते’ पत्र सोशल मीडियावर व्हायरल

On: April 7, 2025 4:44 PM
Sushma Andhare
---Advertisement---

Sushma andhare | गर्भवती तनिषा भिसे यांचा पुण्यातील (Pune) दीनानाथ रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप आमदार अमित गोरखेंचे (Amit Gorakhe) स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीचा जीव दहा लाख रुपये भरले गेले नाहीत म्हणून वाचवता आला नाही, हे समजल्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक भावनिक आणि अंतर्मुख करणारे पत्र लिहिले आहे.

सुषमा अंधारेंचा सवाल

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पत्रात या घटनेचा उल्लेख करत, रुग्णालय प्रशासनाच्या असंवेदनशील वर्तनावर आणि सत्तेच्या जवळ असलेल्या कार्यकर्त्यांनाही मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या व्यवस्थेवर कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, जर हीच वेळ एखाद्या आमदाराच्या थेट घरातील सदस्यावर आली असती, तर प्रशासन तत्काळ कृती करतं, पण कार्यकर्त्याच्या पत्नीच्या बाबतीत असा अन्याय होतो हेच विदारक वास्तव आहे.

त्यांनी कार्यकर्त्यांच्या आयुष्यावरील कटू अनुभव शेअर करत, ‘नेत्याचा राईट हॅंड’, ‘निकटवर्तीय’ अशी विशेषणे वापरली जातात, पण खऱ्या संकटाच्या क्षणी या कार्यकर्त्यांच्या मदतीला कुणीही पुढे येत नाही, असा सवाल उपस्थित केला. कार्यकर्ते 24 तास पक्षासाठी झटतात, पण त्यांचं दुःख कोण ऐकतं?, असा सवाल त्यांनी केला.

जबाबदारीपासून पळालेल्या नेतृत्वावर टीका

अंधारे यांनी त्यांच्या भावनात्मक पत्रात लिहिलं की, जर एखादा कार्यकर्ता आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण वेळ राजकीय कार्य करत असेल, आणि त्याच्या कुटुंबावर आलेल्या संकटाची जबाबदारी आपल्यावर आहे हेच जर नेत्याला समजत नसेल, तर अशा नेतृत्वाला “थू आहे माझ्या पुढारी असण्यावर!” असं त्यांनी स्पष्ट लिहिलं.

या पत्रात त्यांनी सोलापूर आणि उदगीरमधील काही उदाहरणे देत कार्यकर्त्यांच्या घरातील वेदना आणि दुर्लक्षित परिस्थितीचं चित्र मांडलं. सत्तेच्या उच्च पातळीवर असलेल्या लोकांनी या वास्तवाकडे डोळसपणे पाहावं आणि कार्यकर्त्यांच्या संकटात खऱ्या अर्थाने मदतीला धावून यावं, असा संदेश त्यांनी या पत्रातून दिला.

Title: Sushma Andhare’s Viral Letter Shakes BJP

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now