सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आता…

On: October 24, 2023 3:40 PM
---Advertisement---

नाशिक | पुण्यातून फरार झालेला कैदी ललित पाटील यांच्याबद्दल अनेक खुलासे दिवसेंदिवस बाहेर येत आहेत. ललित पाटील याच्या प्रकारणात राजकीय नेत्याचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केले होते.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत दादा भुसेंसह, शंभूराज देसाई यांचा नाशिकच्या ड्रग्स प्रकरणात हात असल्याचं सांगितलं होतं. त्यांची नार्को टेस्ट करा असंही सांगण्यात आलं होतं. त्यानंतर दादा भुसे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानंतर आता सुषमा आंधारे यांनी केलेला आरोप त्यांच्या अंगलट आला आहे.

मंत्री दादा भुसे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर बदनामी केल्यासंदर्भात वकीलांमार्फत नोटीस पाठवली आहे. त्यामुळे नाशिकच्या ड्रग्स प्रकरणात दादा भुसे यांचं नाव घेणं सुषमा अंधारे यांना महागात पडण्याची चिन्हे दिसत आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील ड्रग्स प्रकरणात दादा भुसे यांच्यावर आरोप केले होते.

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर त्यांना सुद्धा हे महागात पडलं आहे. दादा भुसे यांनी आरोप धुडकावून लावत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं होतं. तर दुसऱ्या एका प्रकरणात संजय राऊत यांनी बदनामी केली म्हणून दादा भुसे यांनी मालेगाव कोर्टात खटला दाखल केला होता. त्या संदर्भात कोर्टाची नोटीस पाठवण्यात आली होती. 

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now