देशाचा गृहमंत्री असताना काश्मीरला जाताना माझी XXX’, सुशीलकुमार शिंदे यांचं धक्कादायक वक्तव्य

On: September 10, 2024 4:26 PM
Sushilkumar shinde
---Advertisement---

Sushilkumar shinde l राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काश्मीरबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे देशभरातील राजकीय वातावरण चांगलंच तापताना दिसत आहे. आज सुशीलकुमार शिंदे यांनी लिहिलेल्या एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री असताना काश्मीर गेल्यावर आपली मानसिक अवस्था काय होती, याबाबत एक खलबजानक भाष्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य भाजपने चांगलंच उचलून धरल आहे.

सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले? :

‘मी गृहमंत्री असताना त्यापूर्वी मी विजय धर यांच्याकडे जात होतो आणि त्यावेळी त्यांच्याकडून सल्ला देखील घ्यायचो, त्यांनी मला सल्ला दिला की सुशील, इकडे तिकडे भटकू नकोस. तू लाल चौकामध्ये जा आणि तिथे भाषण कर. तसेच काही लोकांना भेट आणि डल झील फिरायला जा.

याशिवाय त्या सल्ल्यामधून मला खूप प्रसिद्धी देखील मिळाली आणि लोकांमध्ये संदेश गेला की, असा गृहमंत्री आहे जो न घाबरता जातो, पण माझी @#$%@ (आक्षेपार्ह शब्द). मी याबाबद्दल कोणाला सांगू”, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आहे.

Sushilkumar shinde l भाजप पक्षाकडून मोठा दावा :

सुशीलकुमार शिंदे यांच्या संबंधित वक्तव्यानंतर भाजप पक्षाकडून मोठा दावा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात काय परिस्थिती होती हे सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं असल्याचं दिसत आहे. तसेच सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याकडे काँग्रेसने लक्ष द्यावं, असं भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केलं आहे.

“जम्मू-काश्मीरमध्ये आता दहशतवाद आणि फुटीरतावादाचं कंबरडं मोडलं गेलं आहे. तसेच आज लाल किल्ल्यापासूल ते लाल चौकापर्यंत देशाचा तिरंगा फडकत आहे. याशिवाय दहशतवाद आणि दगडफेकीत प्रचंड घट देखील झाली आहे. जिथे आधी गोळ्या झाडल्या जायच्या, पण आता तिथेच क्रिकेट खेळलं जातं” आहे असा दावा भाजपने केला आहे.

News Title – Sushilkumar shinde Statement On Jammu Kashmir

महत्त्वाच्या बातम्या-

मी शहीद होण्यास तयार; मनोज जरांगेंच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

ग्लॅमरस विश्वातील धक्कादायक सत्य समोर; दिया मिर्झाचा मोठा खुलासा

मुलीच्या लग्नाची चिंता विसरा, आता सरकार देणार आर्थिक मदत; काय आहे कन्यादान योजना?

तुम्हाला PM किसान निधीचा 18 वा हप्ता घ्यायचायं? तर ही गोष्ट आजच करा

देवेंद्र फडणवीस…’हा’ बडा नेता स्वतःच्या अटकेची वाट पाहतोय

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now