सूर्याच्या कॅचवरून आफ्रिकन चाहत्यांचे सवाल; माजी दिग्गज खेळाडूने दिलं जोरदार प्रत्युत्तर

Suryakumar Yadav Catch | टी 20 विश्वचषक टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही तुल्यबळ संघात सामना झाला. या सामन्यात टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू हा चर्चेचा विषय ठरला. बुमराह पासून ते सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रोहित शर्मा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीने दिलेली साथ यामुळे हा विश्वचषक टीम इंडियाकडे आला. अशातच सूर्यकुमारने ऐनवेळी घेतलेली कॅच (Suryakumar Yadav Catch) म्हणजे त्याने केवळ कॅच घेतला नाहीतर त्याने टी 20 विश्वचषक कॅच केला असल्याचं बोललं जात आहे. मात्र या कॅचमुळे दक्षिण आफ्रिकेच्या माध्यामांनी सूर्याने पकडलेल्या कॅचवर बोट केलं आहे. त्याला आता दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूने सुनावलं आहे.

काय म्हणाला शॉन पॉलक?

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू शॉन पॉलकने सूर्याने पकडलेल्या कॅचमागचं सत्य सांगितलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे चाहते सूर्याच्या कॅचवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याला आता शॉन पॉलकने उत्तर दिलं आहे. “सूर्यकुमार यादवने जो मिलरचा कॅच पकडला तो पूर्णपणे योग्य होता. त्यात कोणतीही कमतरता नव्हती. सूर्यकुमार यादवचा बाऊंड्रीच्या कुशनला कसलाच पाय लागला नाही,” असं शॉन पॉलकने म्हटलं आहे. (Suryakumar Yadav Catch)

शॉन पॉलक सामन्यावेळी तिथेच होता. त्याने हा सामना पाहिला आहे. त्याने सूर्यकुमारच्या कॅचचं कौतुक केलं आहे. अशातच आता टीम इंडियावर होणारे आरोप हे तथ्यहीन स्पष्ट होतं. शनिवारपासून सूर्याने घेतलेल्या कॅचची जोरदार चर्चा आहे. (Suryakumar Yadav Catch)

एकाबाजूला सूर्यकुमार यादवचं भरपूर कौतुक झालं आहे. दुसऱ्याबाजूला त्याचा पाय बाऊंड्री रोपला लागल्याचा आरोप होता. बाऊंड्री रोप रेषेपासून मागे हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयसीसीच्या बाऊंड्री नियमानुसार हा सिक्स आहे. मात्र अंपायरने हा घाईगडबडीत निर्णय दिला असल्याचा आरोप ट्रोलर्सने केला आहे. यामगील सत्य शॉन पॉलकने सांगितलं आहे. (Suryakumar Yadav Catch)

सूर्याच्या कॅचमुळे टीम इंडियाने सामना जिंकला

पांड्याच्या शेवटच्या (20 व्या) षटकात द. आफ्रिकेला 16 धावांची आवश्यकता होती. सामना अटीतटीचा होता. त्यावेळी पांड्याच्या पहिल्याच चेंडूवर त्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा डावखुरा फलंदाज डेविड मिलर बाद झाला. डेविड मिलरने मारलेला चेंडू हा सीमारेषेवर गेला. त्यावेळी त्या ठिकाणी सूर्यकुमार यादव क्षेत्ररक्षण करत होता. त्याने सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी चाललेल्या चेंडूला रोखलं. त्याने चेंडू सीमारेषेच्या आत ढकलून पुन्हा सीमारेषेच्या आत येत चेंडू कॅच केला. त्यावेळी टीम इंडिया सामना जिंकल्यात जमा झाला होता.

कारण डेविड मिलर हा एक सर्वोत्तम खेळाडू आहे. कदाचित सूर्यकुमारने ती कॅच पकडली नसती तर टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असता. यामुळे सूर्याने पकडलेली कॅच  म्हणजे एक कॅच नसून विश्वचषक कॅच केला असल्याच्या चर्चा आहेत.

News Title – Suryakumar Yadav Catch T20 World Cup Ind Vs Sa Match On Controversy

महत्त्वाच्या बातम्या

महादेवाच्या कृपेने ‘या’ 5 राशींवर होणार धनवर्षाव!

भर कॉन्सर्टमध्ये गायिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार; प्रायव्हेट पार्टबाबत..

विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतमोजणी; ‘त्या’ गोष्टीचा ठाकरे गटाने घेतला धसका?

‘ड्रेस घातलेल्या महिलांनी…’; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य!