जे रोहित-कोहलीला जमलं नाही, ते सूर्यकुमारने केलं; आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास

On: May 2, 2025 10:30 AM
Suryakumar Yadav
---Advertisement---

Suryakumar Yadav | आयपीएल 2025 मध्ये टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) प्रचंड फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सकडून (MI) खेळणाऱ्या सूर्याने सलग सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आयपीएलमधला (IPL) एक अभूतपूर्व विक्रम आपल्या नावावर केला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने स्फोटक फलंदाजी करत आयपीएलमधील सलग 11 सामन्यांमध्ये किमान 25 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

1 मे रोजी झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सूर्याने केवळ 23 चेंडूंमध्ये नाबाद 48 धावा केल्या. त्याच्या या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार होते. स्ट्राइक रेट होता तब्बल 208.69. या इनिंगसोबतच त्याने आयपीएलमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी साध्य केली – सलग 11 सामन्यांत 25 पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

रॉबिन उथप्पाचा विक्रम मागे :

या आधीचा विक्रम माजी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाच्या नावावर होता. त्याने 2014 साली कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना सलग 10 सामन्यांमध्ये 25 हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र सूर्याने आता हा विक्रम मोडीत काढत आयपीएलच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.

सध्या सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 67.85 च्या सरासरीने 475 धावा केल्या असून त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम सीजन 2023 मध्ये होता, जेव्हा त्याने 605 धावा केल्या होत्या. आता तो आपला हाच विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर असून त्याला केवळ 126 धावांची गरज आहे.

Suryakumar Yadav | टी20 वर्ल्ड कपपूर्वी सूर्या ‘सुपरफॉर्म’मध्ये :

सूर्यकुमार यादव सध्या भारताच्या टी20 संघाचा कर्णधार आहे. 2026 च्या टी20 वर्ल्ड कपपूर्वी त्याचा हा फॉर्म टीम इंडियासाठी मोठा आश्वासक संकेत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांना जे जमलं नाही, ते सूर्यकुमारने सातत्याने फलंदाजी करत करून दाखवलं आहे.

News Title: Suryakumar Yadav Breaks IPL Record of Consistent 25+ Scores, Surpasses Kohli and Rohit

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now