‘पंकूताई वाट वाकडी करून…’; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंना सवाल

On: December 28, 2024 3:50 PM
Suresh Dhas on Pankaja Munde
---Advertisement---

Suresh Dhas on Pankaja Munde | संतोष देशमुख प्रकरणात सुरुवातीपासून आक्रमकपणे बाजू मांडत असलेल्या भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज मोर्चाला संबोधित करताना मुंडे बंधू भगिनींवर सडकून टीका केलीये.

माझा सवाल पंकू ताईंना आहे. छत्रपती संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टला उतरला होता. 12 डिसेंबरला गोपीनाथरावांची जयंती आहे, मान्य पण तुम्ही वाट वाकडी करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही?, असा सवाल सुरेश धस यांनी केला.

सुरेश धसांचा पंकजा मुंडेंना सवाल

पंकूताई तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवे आहेत. पंकू ताई तुम्ही चुकला आहात, तुम्हाला द्यायचं असेल तर उत्तर द्या, अन्यथा नाही दिलं तरी चालेल, असंही सुरेश धस यांनी म्हटलंय.

मंत्रीपद भाड्याने दिलं आहे, असं पंकू ताई म्हणत होत्या, पण मी म्हणतो केवळ पालकमंत्री पद नाही तर कृषीमंत्रीपदही भाड्याने दिलं होतं. धस यांनी पैसे गेले तरच फाईल मंजूर होतं होती. ही आमच्या जिल्ह्याची करूण कहाणी, करून कहाणी म्हणतो करुणा नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.

सुरेश धस आक्रमक

ज्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही हत्या केली ती कोनलाच पटली नाही. तरी फेसबुकवर जाऊन असं करीन तसं करीन. धनंजय मुंडे हे बोगस मतावर निवडून आले आहेत. गोलीमार भेजेमे असं गाणं होतं, पण बीड जिल्ह्यात कुठंही गोली मार असं सुरूय, असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी बीडमधील दहशत आणि बंदुकशाहीवरुन हल्लाबोल केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या?; अंजली दमानियांच्या खुलाशाने खळबळ!

सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने घेतला मोठा निर्णय!

प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने मनसे नेता आक्रमक, सुरेश धसांना झापलं

दुर्गप्रेमींनो ‘या’ किल्ल्यावर फिरायला जाणार असाल तर आत्ताच थांबा, 3 दिवस राहणार बंद!

पुण्याजवळच्या खेड, शिरूरमध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा संचार, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now