‘धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड एकाच….’, भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली रोखठोक प्रतिक्रिया

On: December 31, 2024 2:06 PM
Suresh Dhas on Walmik Karad
---Advertisement---

Suresh Dhas on Walmik Karad l बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. कारण या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. अशातच आता याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप आमदार सुरेश धस काय म्हणाले? :

भाजपा आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप केला आहे. “मात्र आता सर्वात चांगली गोष्ट झाली आहे. पळून पळून कुठपर्यंत पळणार? पोलिसांच्या तावडीतून सुटणं एवढी सोपी गोष्ट नसते. कारण याप्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी धडाधड निर्णय घेतली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करणं, खाती गोठवणं सुरु केल्याने त्याने शरण येण्याचा निर्णय घेतला असावा,” असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.

दरम्यान, तपासावर समाधानी आहात का? असा सवाल विचारताच धस म्हणाले की, “इतर आरोपींना देखील लवकरात लवकर अटक केली जावी. तसेच आकांनीच त्यांना मागे ठेवलं असेल. कारण त्यांचा सांभाळ तेच करत असतील” असं ते म्हणाले आहेत.

Suresh Dhas on Walmik Karad l धनंजय मुंडे आणि वाल्मिक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू :

याशिवाय हे प्रकरण टिकवण्यासाठी उज्वल निकम यांच्यासारखा तगडा वकील देखील दिला पाहिजे, कारण ही केस फास्टट्रॅकवर चालवली पाहिजे, त्यामुळे लवकर चार्जशीट दाखल कऱणं आणि अंडर ट्रायल चालणं महत्वाचं आहे अशा अपेक्षा देखील सुरेश धस यांनी व्यक्त केल्या आहेत.

तसेच “मी कधीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. परंतु, ही मागणी त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी केली आहे”. धनंजय मुंडे आणि वाल्मिक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं देखील धस म्हणाले आहेत.

News Title : Suresh Dhas on Walmik Karad Arrest

महत्त्वाच्या बातम्या-

सुरेश धस अखेर नरमले, ‘त्या’ वक्तव्याबाबत प्राजक्ता माळीची मागितली माफी

“गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल तर मग पोलीस…”; देशमुखांच्या मुलीचा संतप्त सवाल

मी वाल्मिक कराड, न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार; स्वतःच व्हिडीओ शेअर करत पोलिसांना शरण

वाल्मिक कराडचा मोठा गौप्यस्फोट, “म्हणाला फाशीची शिक्षा….”

“राजकीय द्वेषापोटी माझं नाव…”; वाल्मिक कराडचा व्हिडिओ व्हायरल

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now