‘सगळेच्या सगळे फासावर…’; सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य

On: January 17, 2025 12:39 PM
Suresh Dhas on Dhananjay Mundes Resignation and Santosh Deshmukh Murder Case
---Advertisement---

Suresh Dhas | भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी आणि वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनाबाबत परखड प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारले असता, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल तेव्हा यातून कोणीच सुटणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“माझ्यासारख्या पामराने काय बोलावे?”

पत्रकारांनी जेव्हा धस यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी, “राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावर आम्ही बोलू शकत नाही. त्यांचा (राष्ट्रवादीचा) दबाव वाढलाय, दबाव जागेवर आहे की दबावच नाही हे मी काय सांगू शकतो? मी भाजपचा माणूस आहे. मी भाजपवाला राष्ट्रवादीचं कसं सांगू?” असा प्रतिप्रश्न केला. “राष्ट्रवादीचा विचार राष्ट्रीय अध्यक्षांबरोबरच भुजबळ, तटकरे, पटेल यांनी करावा आणि काय तो निर्णय घ्यावा. राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नाबाबतीत माझ्यासारख्या पामराने काय बोलावे?” असेही ते म्हणाले.

“सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी न्यायालयीन चौकशीचा फायदा होईल”

या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा फायदा होईल का, असा प्रश्न विचारला असता धस म्हणाले, “एखादी जरी त्रुटी पोलिसांकडून राहिली तरी न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही. या प्रकरणातील जे कोणी आका, बाका, काका, चाचा, मामा जे सगळे लोक आहेत ज्यांनी ज्यांनी संतोष यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी न्यायालयीन चौकशीचा फायदा होईल. लवकरात लवकर चौकशी पूर्ण करावी अशी मागणी आहे.” (Suresh Dhas)

धस यांची प्रतिक्रिया महत्त्वाची का?

सुरेश धस यांची ही प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे कारण ते केवळ भाजपचे आमदार नाहीत तर बीड जिल्ह्यामधील एक प्रभावशाली नेते देखील आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि न्यायालयीन चौकशीची मागणी या प्रकरणाला वेगळे वळण देऊ शकते. (Suresh Dhas)

Title: Suresh Dhas on Dhananjay Mundes Resignation and Santosh Deshmukh Murder Case

महत्वाच्या बातम्या- 

‘चार मुले जन्माला घाला’; ‘या’ बड्या नेत्याचं ब्राह्मण समाजाला आवाहन

शेतात अर्धांगवायूचा झटका, मालकाने हाक देताच बैल सर्जा मतदीला धावला

‘हातात लांब ब्लेड होता, तो जेहबाबाकडे जाऊ लागला’; केअरटेकरने सांगितला हल्ल्याचा थरार

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

‘मी खूप रडले….’; ‘त्या’ व्हायरल किसींग सीनबाबत प्रिया बापट पहिल्यांदाच बोलली

Join WhatsApp Group

Join Now