पंकजा मुंडेंना कोणी पाडलं? सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

On: January 7, 2025 12:03 PM
Pankaja Munde
---Advertisement---

Pankaja munde l लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना केवळ साडे सहा हजारांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवावर बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात मुंडेंपेक्षा वाल्मिक कराडची दहशत जास्त :

भाजप आमदार सुरेश धस यांनी एका मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत नेमक्या कशा पडल्या? तसेच पंकजा मुंडे यांना कोणी पाडलं? याची माहिती दिली आहे. “बीड जिल्ह्यात धनंजय मुंडेंपेक्षा आकाची म्हणजेच वाल्मिक कराडची दहशत जास्त आहे. त्यामुळे आकाने मंत्री धनंजय मुंडेंवर पुर्ण वशीकरण केलं आहे”, असं आमदार सुरेस धस यांनी म्हटलं आहे.

सुरेश धस म्हणाले की, मंत्री धनंजय मुंडेंचा मित्रच वाल्किम कराडने शिल्लक ठेवला नाही. तसेच त्याने बरोबर सगळ्यांचे काटे काढले आहेत. तसेच बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे हे प्रचंड चांगले मित्र होते. मात्र या दोघांच्या मित्रत्वाचं वाटोळं हे विष्णु चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलं आहे. तेव्हापासून बजरंग बाप्पा हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात गेला. तसेच बजरंग बाप्पा जर विरोधात गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभेला पडल्याच नसत्या” असा खळबळजनक खुलासा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

Pankaja munde l पंकजा मुंडे यांचा मोठा गैरसमज :

दरम्यान सुरेश धस म्हणाले की, “बजरंग सारखा तगडा उमेदवार होता. बजरंग बाप्पा बोललेले की अशी छाती फाडली तर एका बाजूला अजित पवार दिसतील तर दुसऱ्या बाजुला धनंजय मुंडे दिसतील. परंतु, त्याची छाती देखील फाडायची गरज पडली नाही तो गेला उभा राहिला आणि आमचं सीट देखील पडलं. त्यामुळे माझ्याबद्दल पंकजा मुंडे यांचा मोठा गैरसमज निर्माण झाला आहे.”

तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका आहे. पण आकाचा आका याचं इतक्या लवकर नाव नाही घेणार. कारण यासाठी थोड थांबाव लागेल. तसेच इतक्या लवकर त्यांना लगेचच आरोपी ठरवणे हे मात्र योग्य नाही. परंतू राजीनामा मात्र त्यांनी दिला पाहिजेच. हे माझं तरी प्रामाणिक मतं आहे. तसेच त्यांना राजीनामा द्यायला अजित पवारांनी भाग पाडावं, असं देखील मला वाटतं अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली.

News Title : suresh dhas big revealation pankaja munde lost the loksabha

महत्वाच्या बातम्या –

तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले; राऊतांचा सरकारवर निशाणा

धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, SIT बरखास्त करून…; मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी कुणी केली?

आनंदवार्ता! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, काय आहेत सध्या दर?

अलर्ट! महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव, ‘या’ ठिकाणी आढळले रुग्ण

यंदाच्या वर्षी विवाहासाठी शुभ मुहूर्त किती?, पाहा संपूर्ण लिस्ट

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now