Suresh Dhas | भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीसंदर्भात (Prajakta Mali) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचा उल्लेख केला होता. यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.
यासंदर्भात प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. या भेटीमध्ये सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्राजक्ता माळीला दिलं होतं. सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा राजकीय क्षेत्रातूनही निषेध करण्यात आला.
मनोरंजन क्षेत्रातील देखील अनेक कलाकारांनी प्राजक्ताची बाजू घेत या प्रकरणी नाराजी जाहीर केली होती. कलाकारांना राजकारणात ओढू नये, अशी भूमिका प्राजक्ताने मांडली होती. अखेर या सर्व प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांनी माफी मागितली.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताई सह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने, त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असं सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले.
तसेच मला भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही, किंवा कुणी माफीसाठी दबाव टाकला नसल्याचं धस म्हणाले. फक्त चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच माझं बोलणं झालं, असंही सुरेश धस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
सुरेश धस-प्राजक्ता माळी वाद काय?
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अनेक अभिनेत्रींचा उल्लेख केला होता. यात त्यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे देखील नाव घेतले होते. धनंजय मुंडे यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सवर सुरेश धस बोलत होते. यावेळी त्यांनी काही अभिनेत्रींचा उल्लेख केला होता. “मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वीटभट्ट्या, जमिनी बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला. या पैशांतून इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना परळीत आणले जाते. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे”, असं वक्तव्य सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केलं होतं.
News Title : Suresh Dhas apologized for his statement about Prajakta Mali
महत्त्वाच्या बातम्या-
“गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल तर मग पोलीस…”; देशमुखांच्या मुलीचा संतप्त सवाल
मी वाल्मिक कराड, न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार; स्वतःच व्हिडीओ शेअर करत पोलिसांना शरण
वाल्मिक कराडचा मोठा गौप्यस्फोट, “म्हणाला फाशीची शिक्षा….”
“राजकीय द्वेषापोटी माझं नाव…”; वाल्मिक कराडचा व्हिडिओ व्हायरल
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण






