Beed | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून संपूर्ण महाराष्ट्रात रोष निर्माण झाला आहे. विशेषत: बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजूनही देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाहीयेत याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
“परळीत प्राजक्ता ताई पण येतात…”
पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर सुरेश धसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंवर टीका केलीये. धनंजय मुंडे यांच्याकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले?, असा सवाल सुरेश धसांनी केलाय.
मला तर वाटते ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे, अशा प्रकारचे शिक्षण घ्यावे आणि देशभरात त्याचा प्रचार प्रसार करावा. आमच्या परळीत पंचतारांकित अभिनेत्री रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळीही येतात. या विभूतींच्या तारखा कशा मिळतात, कशा मिळवायच्या अशा अभ्यासाला परळी पॅटर्न उपयोगाला येईल, असा चिमटा धसांनी धनंजय मुंडेंना काढलाय.
Beed | “पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले?”
धनुभाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले? काय ते सांस्कृतिक कार्यक्रम..! रश्मिका मंदाना, लै कंबर हलवते ती सपना चौधरी, अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे, असं धस म्हणालेत.
देशमुख हत्या प्रकरणावरून माझ्यावर आरोप करणाऱ्यांना माझे राजकारण उद्ध्वस्त करायचे आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. यावर सुरेश धस म्हणाले, अरे बाबा पालकमंत्री तू परत हो… आमचं लेकरू गेलंय, तुम्हाला राजकारणाचं पडलंय, असं म्हणत धसांनी मुंडेंना सुनावलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यावर पावसाचं सावट! ‘या’ तारखेला अवकाळी पावसासह गारपीट होणार?
सतीश वाघ खून प्रकरणी पोलिसांना मिळाला मोठा पुरावा!
RJ सिमरनच्या आत्महत्येबाबत मोठी अपडेट समोर!
संतोष देशमुखांच्या आरोपींना अटक का नाही?; अजितदादांना राष्ट्रवादीच्याचं आमदाराचा सवाल
बीडच्या घटनेची पुनरावृत्ती! धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला






