Supriya Sule | शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी केंद्र सरकारवर दडपशाहीचे आरोप केले आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापुरात दाखल झाली आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांनी संवाद साधला.यावेळी सुळे (Supriya Sule) यांनी गंभीर आरोप केले.
“मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा तेव्हा मझ्या पतीला केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो, आयकर विभाग किंवा सक्तवसुली संचालनालयाची नोटीस येते.”, असा खळबळजनक आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील पाटील देखील उपस्थित होते.
“..तर माझ्या पतीला नोटिस पाठवली जाते”
यावेळी सुळे यांनी मराठा आरक्षणाबाबतही भाष्य केलं. “मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवताना 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारने तो आधी सोडवला पाहिजे.”, असं सुळे म्हणाल्या. या मुद्द्यावर संसदेत बोलायला हवं, असंही त्या (Supriya Sule)म्हणाल्या.
“प्रत्येक अधिवेशनात मी हा मुद्दा मांडत असते. याचबरोबर राज्यातील इतर प्रश्न देखील मी संसदेत मांडत असते. संसद हे असे प्रश्न मांडण्यासाठीचं महत्त्वाचं व योग्य व्यासपीठ आहे आणि मी त्या व्यासपीठाचा पुरेपूर वापर करते. आम्ही दडपशाहीवाले लोक नाहीत. विरोधात बोललं म्हणून आम्ही त्यांना आयकर विभागाची नोटीस पाठवत नाही.”, असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला.
“आम्ही कधीच असं गलिच्छ राजकारण केलं नाही”
पुढे त्या म्हणाल्या की, “आम्ही कधीच असं गलिच्छ राजकारण केलं नाही. भविष्यात सत्तेवर आल्यानंतरही आम्ही असं राजकारण करणार नाही. मी जेव्हा कधी संसदेत विरोधात बोलते, तेव्हा माझ्या पतीला नोटिस येते.कालच एक नोटीस माझ्या कुटुंबाला मिळाली आहे.”
तसंच, यानंतरही मी सरकारविरोधात बोलले. आता अजून एक लव्ह लेटर येईल. आम्ही त्याला नोटीस म्हणत नाही, आम्ही त्या नोटिशींना प्रेमपत्रं म्हणतो. सरकारला प्रश्न विचारला की अशी प्रेमपत्रं येतात,असा खोचक टोला देखील सुप्रिया सुळे(Supriya Sule)यांनी लगावला.
News Title : Supriya Sule Serious allegations against govt
महत्वाच्या बातम्या-
“अजित पवार बारामतीत पराभूत होणार”; ‘या’ खासदाराने केली भविष्यवाणी
“आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार”
ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांवर, चांदीचेही दर वाढले
‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’, राखी पौर्णिमेनिमित भाजपचा खास प्लॅन






