Walmik karad l बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र आता याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडवर अद्याप ईडीची कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित केला आहे.
वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का झाली नाही? :
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराडला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वी देखील नोटीस दिली होती. मात्र त्यावेळी वाल्मिक कराडवर कुठलीही कारवाई न झाल्याने वाल्मिक कराड बिनधास्त होता. मात्र वाल्मिक कराडवर वेळेवर ईडीने कारवाई केली असती तर सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण घडलंच नसतं, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
गेल्या एका महिन्यापासून राज्यात बीड आणि परभणीच्या घटना चर्चेत आहे. मात्र संसदेत या घटनांविरोधात पहिला आवाज खासदार बजरंग सोनवणे यांनी उठवला होता. मग त्यानंतर जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर हे देखील सातत्याने बोलत आहेत, त्यांनी देखील हिवाळी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, अद्यापही वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का झाली नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळायला हवा :
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत केली होती. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील हा विषय सभागृहात विषय मांडला, जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा मांडला. तसेच गेली 30 दिवस ते या विषयावर वारंवार बोलत आहेत. मात्र संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळायला हवा” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
याशिवाय सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “मी अनेक वर्षे संसदेत काम करत आहे. तसेच देशात पीएएमएले कायदा आला, यामधे खंडणी प्रकरणी कायद्यात तरतुदी देखील आहेत. मग मला केंद्र सरकारला प्रश्न विचारायचा आहे की, ED केंद्रासाठी काम करत आहेत. तर संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्या नावाने देखील एक कागद आहे, जो पीएमएलए कायद्याअंतर्गत त्यांना एक नोटीस देखील आली आहे”, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी ती नोटीसच पत्रकार परिषदेत दाखवली आहे. मात्र, अद्यापही त्या अंतर्गत वाल्मिक कराडवर कारवाई होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
News Title : Supriya sule on walmik karad
महत्वाच्या बातम्या –
संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरपंच परिषद आक्रमक; केल्या ‘या’ मागण्या
शेतकऱ्यांनी आता शेती करणं सोडून द्यायचं का?, खतांच्या किंमती पुन्हा वाढल्या
HMPV व्हायरस संदर्भात समस्या असल्यास ‘या’ टोल फ्री नंबरवर संपर्क करा!
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, बीडमधील रुग्णालयात उपचार सुरू






