OBC Reservation | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) मंजुरी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्याने आता निवडणुकीच्या वाटेतील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे राज्यात लवकरच महापालिका व नगरपरिषदा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
नव्या प्रभाग रचनेविरोधातील याचिका फेटाळल्या, कोर्टाचा स्पष्ट निर्णय :
राज्य सरकारने नव्या प्रभाग रचनेनुसार मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आदी महापालिकांमध्ये प्रभाग बदल केले होते. मात्र, या बदलांविरोधात काही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. आता कोर्टाने त्या याचिका फेटाळून लावत स्पष्ट केलं आहे की, प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारचाच आहे आणि निवडणुका नव्याच रचनेनुसारच घेतल्या जातील. (OBC Reservation Election)
या निर्णयानंतर राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने पूर्वीच सांगितलं होतं की, निवडणुका नव्या प्रभागरचनेनुसार आणि राज्य सरकारच्या अधिकारानुसार होतील. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एक याचिका दाखल झाली होती, तीही कोर्टाने फेटाळली आहे.
OBC Reservation | या महापालिकांमध्ये होणार मोठा बदल? :
ओबीसी आरक्षणासह आणि नवीन वॉर्ड रचनेनुसार निवडणुका होतील, हे आता निश्चित झालं आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी प्रभाग रचनेला विरोधही झाला होता, पण आता न्यायालयाच्या स्पष्ट आदेशामुळे प्रशासकीय स्तरावर निवडणुकांचे नियोजन सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (OBC Reservation)
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये प्रभागांचे नवे आराखडे लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या शहरांतील राजकीय गणिते, उमेदवारीची शक्यता आणि निवडणूक यंत्रणा पूर्णपणे नव्याने आखली जाणार आहे.






