गोविंदाच्या अफेयरबाबत पत्नी सुनीताने केला मोठा खुलासा!

On: September 30, 2025 6:36 PM
Govinda-Sunita Divorce Rumor Truth Revealed
---Advertisement---

Sunita Ahuja on Govinda Affair | बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) यांच्या वैवाहिक जीवनाबाबत अनेकदा चर्चा रंगत असते. गेल्या काही वर्षांत त्यांच्या घटस्फोटाच्या (Divorce) अफवांपासून ते वैवाहिक नात्याबाबतच्या अनेक गोष्टी चर्चेत राहिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी गोविंदाच्या एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत कथित अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या. आता सुनीता आहुजाने या अफवांवर पहिल्यांदाच स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गोविंदाच्या अफेयर बाबत केला खुलासा

गोविदांची पत्नी सुनीता यांनी सांगितले की, त्या या अफवांमुळे खूप नाराज आहेत आणि त्यांच्या काही कुटुंबीयांच्या भूमिकेवरही त्यांनी निशाणा साधला. त्यांच्या मुलांनीही या अफवांबाबत प्रश्न विचारल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडेच गोविंदा आणि सुनीता यांनी गणेश चतुर्थी एकत्र साजरी करून घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या.

सुनीता यांनी अभिनेत्री संभवना सेठ यांच्या व्लॉगमध्ये सांगितले की, या अफवांबाबत त्यांना माहीत आहे आणि जर गोविंदाने कधीही खोटे वागले असते, तर त्या स्वतःच ही माहिती माध्यमांना देणाऱ्या पहिल्या व्यक्ती असत्या. त्यांनी म्हटले, “अडथळे निर्माण करणाऱ्या काही लोकांमुळे आमच्या वैवाहिक जीवनात त्रास झाला. काही कुटुंबीय आमचं सुख पाहू इच्छित नाहीत.”

सुनीता पुढे म्हणाल्या: “गोविंदा चांगल्या लोकांसोबत राहतात. जसं मी म्हणते, जर तुम्ही वाईट लोकांसोबत राहाल, तर तुम्ही त्यांच्यासारखे व्हाल. आज माझे मित्र नाहीत, माझी मुलेच माझे मित्र आहेत.”

गोविंदा आणी पत्नीच्या घटस्फोटाबद्दल चर्चा

त्यांनी स्पष्ट केले की, गेल्या 15 वर्षांपासून ते आणि गोविंदा वेगळ्या घरात राहत आहेत, तरीही गोविंदा नियमितपणे घरी येतात. सुनीता यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “जो चांगल्या स्त्रीला दुःख देईल, तो कधीही सुखी राहणार नाही. मी त्याला माझं संपूर्ण आयुष्य दिलंय आणि आजही त्याच्यावर प्रेम करते. नक्कीच मी नाराज आहे, पण माझ्या मुलांमुळे मी खंबीर आहे.”

सुनीता आहुजांच्या या खुलास्यानं त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी आणि अफवांबाबतची खरी स्थिती समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या जोडप्याविषयी स्पष्ट समज मिळेल.

News Title :- Govinda’s Alleged Affair with Actress? Wife Makes Major Revelation

Join WhatsApp Group

Join Now