Sunita Ahuja | अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) हे जोडपे पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. गोविंदाचे (Govinda) एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर (Marathi actress affair) असल्याच्या चर्चांवर सुनीता (Sunita) यांनी नुकतेच भाष्य केले. त्यांनी या अफवांवर आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
“रंगेहाथ पकडेन तेव्हाच मानेन” :
सुनीता आहुजाला गोविंदाच्या (Govinda) कथित अफेअरबद्दल विचारण्यात आले. “मी ऐकत आहे की गोविंदाचे (Govinda) अनेक अफेअर मी सुरू आहेत. कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, अमुक आहे, तमुक आहे… अशा अफवा माझ्या कानावरही येत आहेत,” अशी कबुली त्यांनी दिली.
मात्र, या केवळ अफवा असल्याचे सांगत सुनीता (Sunita) म्हणाल्या, “मी जोपर्यंत माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही आणि गोविंदाला (Govinda) रंगेहाथ पकडत नाही, तोपर्यंत मी यावर शिक्कामोर्तब करू शकत नाही.” त्यांनी स्पष्ट केले की, सध्या तरी या गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही, पण या चर्चा सुरू असल्याची जाणीव त्यांना आहे. यापूर्वी गोविंदा (Govinda) आणि सुनीता (Sunita) वेगळे राहत असल्याच्या आणि तिने घटस्फोट मागितल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
Sunita Ahuja | “हे वय अफेअरचं नाही, मीच मीडियाला सांगेन” :
सुनीता (Sunita) पुढे म्हणाल्या की, “हे सगळं करायचं हे गोविंदाचं (Govinda) वय नाही.” त्यांनी गोविंदाला (Govinda) त्याच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून दिली. “आता त्याने मुलीला सेटल करण्यावर आणि मुलगा यशच्या (Yash) करिअरवर लक्ष केंद्रित करायला हवे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
सुनीता (Sunita) यांनी आपल्या बेधडक स्वभावावरही भाष्य केले. “मी हजार वेळा सांगितले आहे की, जोवर मी तोंड उघडत नाही तोवर विश्वास ठेवू नका. मी खोटं बोलत नाही, तोंडावर बोलते. मी स्वतः मीडियाला बोलावून विचारेन की, ‘गोविंदाने (Govinda) जे केले ते योग्य आहे का? चाळीस वर्षांची पत्नी हवी की दुसरी कोणी?’ मग चाहते माझी बाजू घेतात की गोविंदाची (Govinda) तेच मला पाहायचे आहे.”






